गौरवकुमार पाटील / अमळनेर – येथून जवळच असलेल्या झाडी गावाजवळ काल रात्री महावितरण कर्मचाऱ्यांला मोटारसायकल वरून मागून आलेल्या युवकांनी रस्ता विचारण्याचे बहाण्याने थांबवून ४२ हजार ६६३ रुपये किमतीची सोनसाखळी दोन अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली याबाबत पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की वावडे शिरसाळे गावात महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ असलेले हरी नामदेव शेळके वय २७ हे अमळनेर हुन झाडी मार्गे वावडे येथे वीजपुरवठा सुरू करणासाठी रात्री ८ वाजता जात असताना विना नंबरच्या लाल रंगाची बजाज पल्सर या मोटारसायकल वरून मास्क लावलेल्या दोन युवकांनी पाठलाग करत झाडी गावाचे एक किलोमीटरवर बेटावद रस्ता विचारण्याचे बहाण्याने थांबवून ,मागे बसलेल्या युवकाने गळ्यातील ४२ हजार ६६३ रुपये किमतीची गळ्यात घातलेली सोनसाखळी हिसकावून भरवस रस्त्याने धूम ठोकली , याबाबत हरी नामदेव शेळके राहणार मिलचाळ अमळनेर यांनी फिर्याद दिल्याने मारवड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात युवकांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव व हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत , झाडी गावाजवळ मागे ही गावठी कट्टा विक्री निमित्त बाळगणारा युवकाला एलसीबीने रात्रीतून रंगेहाथ पकडले होते ,या रस्तावरून रात्री जातांना नागरिकांत घबराट निर्माण झाली असून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.