बोदवड – शहरातील मलकापूर रस्त्यावरील गटार बांधण्यासाठी जेसीपीने खोदकाम करीत असतानाचं चौकात असलेल्या तीस वर्षांपासून उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या नावाचा ‘बोर्ड’ काढून टाकण्याच्या प्रयत्नात असतांना समाज बांधवानी त्यास कडाडून विरोध केला असून या घटनेचा श्री.राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असल्याचं खान्देश विभाग अध्यक्ष विलाससिंग राजपूत यांनी सांगितलं. दरम्यान समाज बांधवानी देखील गटारीचे कामं घेतलेल्या कंत्राटदाराच्या कामगारांसोबत वाद होऊन बोर्ड काढल्यास याद राखा अशी तंबी देण्यात आली आहे.

गेल्या तीस वर्षापासून तर आजतगायत बोडवड मलकापूर रोडलागत चौफुली येथे अपराजित योद्धा हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे नावाने बोर्ड होता तो बोर्ड आज अचानक काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याच महिन्यात 9 मे महाराणा प्रतापसिंह जयंती असताना एका गटार ठेकेदाराने समाज बांधव यांना विश्वासात न घेता जेसिपी द्वारे बोर्ड तोडण्याचे काम केले व महाराणा प्रताप सिंह यांच्या बोर्डाची अवहेलना केली.

दरम्यान तात्काळ हा प्रकार लक्षात आला असता बोदवड नगरसेवक श्री भरत सिंह आप्पा पाटील ,महाराणा प्रताप सिंह उत्सव समिती माजी तालुका प्रमुख डॉ. सुधीर पाटील ,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना तालुका प्रमुख अजय सिंह पाटील व स्थानिक राजपूत समाज ग्रामीण भाग मधून राजपूत समाजाचे युवक एकत्र येत ठेकेदार ,काम करणारी यंत्रणा यांना जबाब विचारत धारेवर धरले असता बोर्ड पूर्ववत करून देण्याचे आश्वासन मिळाल्या नंतर समाज बांधव यांनी शांतता घेतली.
9 मे जयंतीच्या आधी अगोदर बोर्ड पूर्ववत करावा अन्य था गटार बांधकाम होवू देणार नाही अशी भूमिका समाज बांधव यांनी घेतली
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने निषेध
बोदवड येथील घडलेला प्रकार हा निंदनीय असून या घटनेचा ठेकेदार आणि सदर काम करणारा विभाग यांचा निषेध श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील,सह खान्देश विभाग प्रमुख विलाससिंह पाटील जिल्हा प्रमुख व सर्व तालुका प्रमुख या घटनेचा निषेध नोंदवला आहे.तरी तात्काळ बोर्ड पूर्ववत करावा अशी मागणी राजपूत समाज संघटन ,राष्ट्रीय राजपूत करणी व समाज बांधव करीत असून बोर्डाचे काम वेळेत न झाल्यास मोठा लढा बोदवड शहरात राजपूत समाज करणी सेना उभा करेल याची नोंद शासनाने घेवून होणाऱ्या परिणामास प्रशासन व सरकार असेल असे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रमुख विलास सिंह पाटील यांनी दिला आहे.










