जळगाव, दि. ४(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे राज्यात ‘गाव चलो अभियान’ हे आज दि ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होतं असून या व्यापक अभियानात राज्यातील ७ लाख प्रवासी कार्यकर्ते शेवटच्या मतदारापर्यंत पोहचणार आहेत. राज्यातील महत्वपूर्ण अभियानाचे प्रमुख म्हणून स्वतः ना गिरीश महाजन हे नेतृत्व करीत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी आज भाजपा कार्यलय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलतांना मंत्री महाजन म्हणाले की,संपूर्ण देशात भाजपाचे ‘गाव चलो अभियानाची’ सुरुवात आजपासून करण्यात आली असून ११ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहेत, जळगाव जिल्ह्यातील तब्ब्ल तीन हजार आठशे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते गावा पर्यंत जाऊन २४ तास थांबून मोदी सरकारच्या काळातील अर्थात गेल्या १० वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन विकसित भारताची संकल्पना मांडतील. मतदारांशी हितगुज करतील विकास विषयावर चर्चा करतील शासनाच्या माध्यमातून शेतकरी अनुदान शासकीय लाभाच्या ईतर योजना तसेच मतदार नोंदणी ते मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या वर प्रवासी कार्यकर्ते काम करतील विकास गरिब कल्याण या विषयावर भर देवुन सर्व सामान्य लोकांचे जीवनमान उंचावेल यासाठी भर देण्यात येणारं आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला आ. राजुमामा भोळे, जळकेकर महाराज, सौ. उज्वला बेंडाळे, सौ. भारतीताई सोनवणे, डॉ. उल्हास पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.