महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, हा यामागील हेतू आहे.
हे सुद्धा वाचा….
तुमचा स्मार्ट मोबाईल फोन रेकाॅर्ड करतोय तुमचं खाजगी बोलणं? ‘ही’ सेटिंग लगेच करा बंद,अन्यथा…
भारतीय नौदलात सुवर्णसंधी 10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..