राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती अखेर राज्य शासनाने भरती प्रक्रिया सुरु करण्यास संबंधित विभागाला आदेश दिले आणि गेल्या तीन वर्षांपासून राखडलेल्या भरतीला प्रत्यक्षात मुहूर्तरूप मिळाले असून पदभरती बाबत आरोग्य विभागाने जाहिरात काढली आहे.काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि या भरती प्रक्रियेला सुरूवात केली. आता त्यासंबंधित जाहिरात प्रसिद्ध झाली असून शासनाच्या आरोग्य विभागात नोकरी करणाऱ्या पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
10,949 जागांसाठी निघाली जाहिरात
आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघाली आहे. आरोग्य सेवकांच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी होणारी ही भरती MPSC, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ‘क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे
2011 साली ही भरती प्रक्रिया सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता, त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती, आता पुन्हा आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा सुरु होणार आहे.
या पदांचा समावेश (Health Department Recruitment)
गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक,वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा अतिरिक्त ताण कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळत आहे.