जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे इसमांविरुध्द मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांचे कडेस आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडून चौकशी करुन ते खरोखर जिल्हयांतून हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयी आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन हददपार करण्यात येत आहे.
एमआयडीसी पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०१ / २०२३ प्रमाणे सामनेवाले १) भावना जवाहरलाल लोढा वय ३८ रा. अयोध्यानगर, जळगाव टोळी प्रमुख (२) अनिल रमेश चौधरी वय ४०, टोळी सदस्य, रा. अयोध्यानगर, जळगाव, (३) सैय्यद सजील सैय्यद हारुन वय २६ टोळी सदस्य रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव, (४) सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट वय २६ रा. मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव, (५) सैय्यद अराफत सैय्यद फारुख वय ३४ रा.तांबापुरा, जळगाव जि.जळगाव यांचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे. जामनेर पो.स्टे. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे., पहुर पो.स्टे., चाळीसगाव शहर पो.स्टे., नशिराबाद पो.स्टे. व चाळीसगाव रेल्वे पो.स्टे. ला एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर सामनेवाले यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव उपविभाग यांनी केलेली आहे.
सदर सामनेवाले यांनी टोळीने राहुन जळगाव शहरात जिल्हयांत ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांत शांतता ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे. चे पो. निरी. श्री. जयपाल हिरे, सफौ/ अतुल वंजारी, पोना/सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, चापोना / इम्तियाज खान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.
एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती सामनेवाले यांना १ वर्षाकरीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पो. निरी. श्री. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी व त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ / युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ/सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.