जळगाव । जळगाव शहरातील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पवन अमरसिंग पवार (वय-३०) रा. सुप्रिम कॉलनी, असं मृत तरुणाने नाव असून त्याचं तीन महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवन पवार हा तरूण जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, गुरूवारी घरातील सर्वजण कामाला निघून गेले होते. पवनची आई दुर्गाबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे पवन हा घरात एकटाच होता. त्याने राहत्या घराच्या मधल्या खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
पवन पवार यांचा विवाह तीन महिन्यापुर्वीच झालेला होता. घरात सर्व एकत्र कुटुंब असतांना सर्वजण हसतखेळत राहता असतांना अचानक त्याने टोकाचा निर्णय का घेतला. याची माहिती मिळाली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.

