Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

नविन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाचे विद्यार्थीही अभ्यासणार महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान

najarkaid live by najarkaid live
July 27, 2023
in जळगाव
0
गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दि. 27 (प्रतिनिधी) – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात आज महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कराराद्वारे शैक्षणिक, संशोधन आदान-प्रदान, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आदींचा समावेश आहे. याअंतर्गत विद्यापिठातील विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमांमधे सहभागी होता येणार आहे.

महात्मा गांधीजींची विचारधारा यांचा प्रचार-प्रसारासाठी पीजी डिप्लोमा, संपोषित ग्रामीण पुर्ननिर्माणासाठी स्नातकोत्तर डिप्लोमा, संघर्ष परिवर्तनवर कार्यशाळा, युवा पिढीचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प, आंतरराष्ट्रीयस्तरावर शांती व अहिंसेच्या संदर्भात विंटर स्कूल, संशोधनासाठी वेगवेगळे इंटर्शनशिप, फेलोशिप, महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन यांच्यासह गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रामविकास असे विविध उपक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन राबवित असते. या सर्व उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील विद्यार्थ्यांनाही यात संधी निर्माण होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने यापूर्वी अमेरिकेतील एरिझोना स्टेट विद्यापीठ, मेक्सिकोमधील सायंटिस विद्यापीठ, महात्मा गांधीद्वारा स्थापित गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, इटली येथील पीस फाऊंडेशन आदींमधे यापूर्वी सामंजस्य करार केलेले आहेत. या श्रृखंलेत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

या करारावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. डॉ. गिता धर्मपाल यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या, यावेळी विद्यापिठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व संचालक डॉ. राजेश जावळेकर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने वरिष्ठ सल्लागार व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, समन्वयक उदय महाजन, असोसियट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. विद्यापीठातर्फे प्रा. ए. एम. महाजन, प्रा. सतीष कोल्हे, प्रा. डी. एच. मोरे, प्रा. पी. पी. माहुलीकर, डॉ. विकास गिते, प्रा. प्रविण पुराणीक, प्रा. उमेश गोगडीया, प्रा.दीपक सोनवणे, सीए. रवींद्र पाटील, पीआरओ डॉ.सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. के. बी. पाटील यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन व विद्यापीठाच्या कराराद्वारा भविष्यात युवकांसाठी रचनात्मक शिक्षण प्रणालीत नव-नवीन संकल्पना साकार होतील. डिग्रीपेक्षा प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव घेता येईल, असे प्रतिपादन यावेळी केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी हा करार ऐतिहासीक असल्याचे सांगितले. डॉ. राजेश जावळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
ADVERTISEMENT
Previous Post

त्वचेवर खाज येणे हे ‘या’ धोकादायक आजाराचे लक्षण, त्वरित उपचार करा

Next Post

तीन महिन्यापुर्वीच विवाह;घरी एकट्या असता तरुणाने केलं असं काही.. जळगावातील घटना

Related Posts

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

September 27, 2023
‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

September 27, 2023
राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

September 26, 2023
पारोळा नगरपालिकेने आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठाच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे –   जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पारोळा नगरपालिकेने आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठाच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे –  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

September 26, 2023
सर्प दंश झाल्यास तात्काळ करा ‘या’ उपाय योजना

जळगाव जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यु ; सर्पदंश झाल्यावर काय करावे, काय करू नये… वाचा

September 26, 2023
राष्ट्रीय राजपूत करणीसेनेच्या राज्य कार्यध्यक्ष पदी प्रवीणसिहं पाटील यांची निवड

राष्ट्रीय राजपूत करणीसेनेच्या राज्य कार्यध्यक्ष पदी प्रवीणसिहं पाटील यांची निवड

September 26, 2023
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

तीन महिन्यापुर्वीच विवाह;घरी एकट्या असता तरुणाने केलं असं काही.. जळगावातील घटना

ताज्या बातम्या

नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

२९ तारखेला शासकीय सुटी जाहीर ; शासनाकडून अधिसूचना जारी

September 27, 2023
गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

September 27, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

September 27, 2023
‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

September 27, 2023
राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

September 26, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

September 26, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us