मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. जर आम्हाला भाजपासोबत जायचं नव्हते तर २०१४ मध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. असाही सवाल अजित पवार यांनी उपस्थिती केला .
बंडखोरी नंतर आज मुंबईत अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी काका शरद पवार यांची पोलखोल केली.
2017 काही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला. त्याआधी 2014ला आम्ही सिल्व्हर ओकला होतो. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देऊ. आम्ही शांत बसलो. कारण नेत्याचा निर्णय होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं वानखेडेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहा. आम्ही गेलो.
हे पण वाचा
पुढील चार दिवस मुसळधार! ‘या’ भागांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी
बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं
Video : उर्फीचा नवा अवतार पाहून युजर्सही झाले अवाक्..
अजित पवारांच्या बाजूने किती आमदार? राष्ट्रवादी प्रतोद अनिल पाटलांचा मोठा दावा
तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. त्यांनी आमची विचारपूस केली. भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला तिकडे का पाठवलं? शपथविधीला का पाठवलं? 2017ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. सुनील तटकरे, मी, जयंत पाटील होते. सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत तावडे हे लोक होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्रीपदं… मी कधीही खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद ठरणार नाही, असं ते म्हणाले.
मधल्या निवडणुकीत राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला नको होतं. ती संधी घ्यायला हवी होती. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री राहिला असता, असं अजित पवार म्हणाले.

