सिधी । मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून समोर आलेल्या एका व्हिडीओने संपूर्ण समाजाला लाजवेल अशी स्थिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात सिगारेट धरून आदिवासी मजुरावर लघुशंका करत आहे. मानवतेला कलंकित करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रवेश शुक्ला असे असून तो भाजपचा पदाधिकारी आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरूण गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका करत आहेत. त्यावेळी तो मजूर शांत बसला आहे. तर त्या तरुणाच्या मित्रांनी हा व्हिडिओ शुट केला आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावचा आहे. तो मजुरीचे काम करतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भाजपा राज में आदिवासी भाइयों का कैसे सम्मान करते है नज़ारा देखिये ।
मुख्यमंत्री जी – गृहमंत्री जी आप दोनों ज़बानी जमा-खर्च तो खूब करते हो मगर कार्यवाही कुछ नहीं होती ।
अभी तक यह व्यक्ति गिरफ्तार क्यों नहीं हुआ?
पुलिस ने क्या इसीलिए गिरफ्तार नहीं किया कि यह एक विधायक प्रतिनिधि है? pic.twitter.com/JKjHPpoTTq— Arun Subhash Yadav ???????? (@MPArunYadav) July 4, 2023
आरोपीविरोधात सिधी येथील स्थानिक पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम २९४ आणि ५०४ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. यावरून तिथे राजकारण रंगले आहे.

