मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली असून मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आणि खासदार आहे याचा निश्चित आकडा अजूनही समोर आलेला नाही. यात राष्ट्रवादी प्रतोद अनिल पाटलांचा मोठा दावा केला. अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा अनिल पाटील यांनी केला आहे.
आम्ही सगळ्या आमदारांना व्हीप बजावला आहे. 40 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत आहेत, असे अनिल पाटील म्हणाले. तर सरकारला कोणतेही बहुमत सिद्ध करायचे नाही त्यामुळे इथे आकडा महत्त्वाचा नाही. पक्षातील 95 टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, आमचा व्हिप सर्व आमदारांना लागू होतो. गरज पडल्यास आम्ही देखील न्यायलयीन लढाईला सामोरे जाऊ. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.
हे पण वाचा..
मुलगा कॅबिनेट मंत्री; तरी आजही आई राबतेय शेतात, एसटीने करतात ये- जा: अनिल पाटील यांच्या आईचा साधेपणा
रिलायन्सचा धमाका! Jio ने लाँच केला फक्त 999 रुपयांमध्ये 4G फोन ; जाणून घ्या यात काय आहे खास?
..अन् भरधाव कंटेनर घेतला 12 जणांचा जीव ; शिरपूर अपघाताची थरारक घटना CCTV कैद
दरम्यान, अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केलाय. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवलीय. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

