पुणे : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आता हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील चार दिवस महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे, उर्वरित जिल्ह्यांबद्दल अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने मुंबईसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने 5 जुलैसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि 6-7 जुलैसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा
बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, भाजपसोबत जाण्याचं कारण सांगितलं
Video : उर्फीचा नवा अवतार पाहून युजर्सही झाले अवाक्..
अजित पवारांच्या बाजूने किती आमदार? राष्ट्रवादी प्रतोद अनिल पाटलांचा मोठा दावा
मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे गुरुवारी पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. तसेच साताऱ्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
राज्यात यंदा मान्सून उशिराने आला. दरवर्षी राज्यात मान्सून सात जून रोजी दाखल होतो. परंतु यंदा मान्सून उशिराने आला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून २५ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अजून सर्वच जिल्ह्यात मुबलक पाऊस झालेला नाही. अजून अनेक जिल्ह्यांत चांगल्या पावसाची गरज आहे.

