जळगाव : जळगाव जिल्हा हा केळीबाबत प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील केळीला देश विदेशात मोठी मागणी आहे. परंतु जिल्ह्यात मागील हंगामात लागवड केलेल्या केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरसचा फैलाव झाला होता. यामुळे हजारो हेक्टरवरील केळीचे नुकसान झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दरात मोठी वाढ झाली.
काय आहे दर ?
बुधवारी बऱ्हाणपूर बोर्डावर केळीला क्विंटलला ३४०० रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. किरकोळ बाजारात देखील केळीचे भाव ५० ते ६० रुपये डझनावर गेले आहेत. आगामी काळात कापणीवर येणारी केळीची आवक कुकुंबर मोझॅक व्हायरसच्या प्रभावामुळे कमी राहणार असल्याने दरवाढीचा हा फुगवटा यंदाच्या हंगामापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात केळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारात केळीची आवक कमी झाली आहे. व्यापाऱ्यांकडून दर्जेदार केळीची मागणी होत असल्याने विक्रमी भाव मिळत आहे. आगामी काळात कापणीवर येणाऱ्या केळीचे उत्पादनही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात महाशिवरात्री असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे पण वाचाच..
काय सांगता! आता एटीएममधून नोटा नाही नाणी बाहेर येणार, 12 शहरांमध्ये सेवा सुरू होणार
शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुमच्या नावाखाली शेतकऱ्याला लाखो रुपायचा चुना..
आधी मैत्री मग लग्न ; पण हनीमूनच्या रात्री पत्नीविषयी गुपित कळल्याने तरुणाच्या पायाखाली जमीनच सरकली..
उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार, पण.. मंत्री दीपक केसरकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
…असा मिळतो दर
– जळगाव जिल्ह्यात सर्वत्र जी-९ केळीची लागवड केली जाते.
– एका सामान्य घडाचे वजन १८ ते २२ किलोपर्यंत असते.
– एका क्विंटलमध्ये पाच ते सहा घड बसतात.
– एका घडावर साधारणपणे नऊ केळीच्या फळाच्या फण्या असतात.
– एका फणीत १८ ते २२ केळी असतात.
– घाऊक बाजारात एका नगास २ रुपये ५० ते ७० पैसे इतका भाव; किरकोळ बाजारात दुप्पट दर

