चाळीसगाव,(प्रतिनिधी)- अंगावर शहारे आणणारी घटना चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री प्र. दे. येथून समोर आली आहे २ महिन्यांच्या गुंजन या चिमुकलीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला. सदर घटना मंगळवारी रात्री घडली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
काय आहे घटना….
प्राप्त माहिती नुसार गावातील अरविंद पाटील हा कोयता घेऊन रात्रीच्या सुमारास घरात शिरला. महिलेस त्याने कोयत्याचा धाक दाखवत गप्प बसण्यास सांगितले. नंतर घरातील बिर्याणी खाल्ली व नंतर विवाहितेवर कोयता उगारून खिशातील रुमालाने दोन महिन्यांची बालिका गुंजन सोनू ठाकरे हिचे नाक व तोंड दाबले. त्यातच याचिमुकलीचा मृत्यू झाला.
अरविंद कैलास पाटील (४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंप्री प्र. दे. येथील शोभना सोनू ठाकरे (२७) ही पती, मुलांसह वास्तव्यास आहे. पती सोनू ठाकरे हा मोजमजुरी करतो. याबाबत विवाहितेने पतीला या घटनेची माहिती दिल्यानंतर संशयिताचा पाठलाग करण्यात आला. मात्र, तो तत्पूर्वीच पसार झाला. मेहुणबारे पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला.