मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा प्रशासनात मोठा प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्यात. बुधवारी 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
कुणा कुणाची बदली?
विरेंद्र सिंह – IAS (2006) – वैद्यकीय शिक्षण, आयुक्तपदावरुन महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशचे एमडी म्हणून बदली
मिताली सेठी IAS-2017 – डायरेक्टर, वानामती, नागपूर
सुशील चव्हाण IAS-2007 – औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदावरुन मुंबईत असंघटीत कामगार डेव्हलपमेन्ट कमिशनर म्हणून बदली
अजय गुल्हाने, IAS-2010 – चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरुन आता अतिरीक्त पालिका आयुक्त नागपूर म्हणून बदली
दीपक कुमार मीना IAS-2013 – नागपूर पालिकेचे अतिरीक्त आयुक्त पदावरुन अतिरीक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून बदली
विनय गोवडा IAS-2015 – सीईओ, जिल्हा परीषद साताराहून आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली
आर.के. गावडे IAS-2011 – नंदुरबार झेडपी सीईओ पदावरुन आता मुंबई अतिरीक्त निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती
माणिक गुरसल IAS-2009 – अतिरीक्त आयुक्त (उद्योग)
शिवराज श्रीकांत पाटील IAS-2011 – महानंद मुंबईचे एमडी म्हणून नियुक्ती
अस्तिक कुमार पांडे IAS-2011 – औरंगाबादचे जिल्हाधिकारी
लीना बनसोड IAS-2015 – एमडी, एम.एस को ऑप. ट्रायबल देवे. कॉर्पोरेशन, नाशिक म्हणून नियुक्ती
दीपक सिंगला IAS-2012- एमएमआरडीचे जॉईन्ट कमिशन म्हणून मुंबईत नियुक्ती
एस.एस माळी IAS-2009 – संचालक, ओबीसी बहुजन वेल्फेअर संचालनालय, पुणे म्हणून नियुक्ती
एस.सी. पाटील IAS-9999 – जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईत येथे नियुक्ती
डी.के खिलारी IAS-9999 – सातार झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती
एस.के. सलिमनाथ IAS-2011 – सिडको, मुंबई येथे जॉईन्ट एमडी म्हणून नियुक्ती
एस.एम.कुर्तकोटी IAS-9999 – नंदुरबार झेडपीचे सीईओ म्हणून नियुक्ती
राजीव निवतकर IAS-2010 -मुंबई जिल्हाधिकारीसह वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती
बी.एच पालवे IAS-9999 – अतिरीक्त विभागीय आयुक्त नाशिक म्हणून नियुक्ती
आ.एस. चव्हाण IAS-9999 – जॉईन्ट सेक्रेटरी, रेव्हेन्यू स्टॅम्ट आणि वनविभाग, मंत्रालय मुंबई म्हणून नियुक्ती
बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केलाय. याआधी 44 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे एकूण 64 अधिकाऱ्यांच्या बदल्या आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आल्या आहेत.