जळगाव, दि.१२ (प्रतिनिधी) :- मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन नूतनीकरण च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती 22 सप्टेंबर,2022 पासून सुरू करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येते.
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणान्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही.
1) शैक्षणिक सस्त – प्राप्त झालेले ऑनलाईन अग्रेषित करण्याकरिता प्रस्तावित मुदत (संबंधित महाविद्यालयाच्या प्रचार्याकरिता ) – प्राप्त झालेले ऑनलाईन अग्रेषित करण्याकरिता प्रस्तावित मुदत ( संबंधित जिल्ह्यातील सहाय्य्क आयुक्त स.क. यांचे करिता )
2) कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम ( उदा. इ. 11 वी, 12 वी ( सर्व शाखा) इ.11 वी 12 वी (MCVC) , ITI ) इत्यादी कनिष्ठ महाविद्यालयातील भ्यासक्रम ( उदा. इ. 11 वी, 12 वी (सर्व शाखा) , इ. 11 वी 12 (MCVC), ITI ) इत्यादी नवीन अर्ज – दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 8 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत व दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत, नुतनीकरण अर्ज दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत , व दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत,
3) वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम ( उदा इ.प्रथम, व्दितीय व तृतीय ( सर्व शाखा – कला, वाणिज्य, विज्ञान इ.) , नवीन अर्ज दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 20 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 31ऑक्टोंबर, 2022 पर्यंत , नुतनी करण – दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत , दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 31 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत
4) व्यावसायिक अभ्यासक्रम ( उदा. इ. प्रथम, व्दितीय, तृतीय, अंतिम वर्ष ( सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रम व नर्सिंग अभ्यासक्रम फार्मसी इ. ) नवीन अर्ज – दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 7 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत, दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत,
नुतनीकरण अर्ज – 22 सप्टेंबर, 2022 ते 31 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत, दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 7 नोव्हेंबर, 2022 पर्यंत, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.