Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

43 लाख रुपयांचे बक्षीस असणाऱ्या पाच नक्षलवादी पोलीस चकमकीत ठार !

najarkaid by najarkaid
March 30, 2021
in राज्य
0
शुक्रवार 26 मार्च रोजी भारत बंद ; पाचशे पेक्षा जास्त संघटना एकत्र ; राष्ट्रवादीचा पाठिंबा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 30 : उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.

या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी हे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

पोलीस-नक्षल चकमक

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांनी नक्षलविरोधी अभियानाची आखणी केली. त्यानुसार श्री.कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 च्या जवानांनी नक्षलविरोधी कारवाई सुरु केली. त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढविला. सी-60 जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळी 3 पुरुष नक्षलवादी व 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असून मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.

43 लाख रुपयांचे बक्षीस

यात मृतक नक्षलवाद्यांवर जवळपास 43 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत सदर घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक 12 बोअर रायफल, एक 303 रायफल, एक 8 एमएम रायफल तसेच मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पुढील प्रमाणे आहे.

1) रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी वय-46 वर्ष रा. जवेली (बु.) पोस्टे जारावंडी (डीकेएसझेडसीएम) टिपागड एलओएस पदावर कार्यरत होता. याच्यावर एकूण- 155 गुन्हे दाखल असुन यात खुनाचे- 41 गुन्हे, चकमकीचे – 78 गुन्हे, दरोडा-1 विविध जाळपोळीचे- 16 गुन्हे, व इतर-19 अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

2) राजु ऊर्फ सुखदेव बुधेसींग नैताम वय-32 वर्ष रा. मरकेगाव पोमके सावरगाव टिपागड एलओस उपकंमाडर या पदावर कार्यरत होता. एकूण- 14 गुन्हे दाखल असून यात खुनाचे- 05 गुन्हे, चकमकीचे – 03 गुन्हे, जाळपोळीचे- 03 गुन्हे, दरोडा-01 व इतर -02 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

3) अमर मुया कुंजाम वय-30 वर्ष रा. जागरगुडा बस्तर एरीया (छ.ग.) पार्टी मेंबर कसनसुर एलओएस या पदावर याच्यावर एकूण- 11 गुन्हे दाखल असुन यात चकमकीचे 08 गुन्हे व इतर -03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

4) सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनीता गावडे ऊर्फ आनाम वय-38 वर्ष रा. कापेवंचा उपपोस्टे राजाराम (खां.) टिपागड एलओएस प्लाटुन क्र. 15 ची पार्टी मेंबर हिचेवर एकूण- 31 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 11 गुन्हे, चकमकीचे – 11 गुन्हे, व इतर -09 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकूण 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

5) अस्मिता ऊर्फ सुखलु पदा वय – 28 वर्ष रा. गुर्रेकसा पोमके कटेझारी टिपागड एलओएस पार्टी मेंबर हिचेवर एकूण-11 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 01 गुन्हे, चकमकीचे – 05 गुन्हे, जाळपोळीचे- 02 गुन्हे व इतर – 03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकूण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आजही हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळले तर सलग तिसऱ्या दिवशीही 14 बाधितांचा मृत्यू

Next Post

चितोडा येथील बेपत्ता अपंग शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
चितोडा येथील बेपत्ता अपंग शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद

चितोडा येथील बेपत्ता अपंग शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us