नवी दिल्ली: महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावर घटनापीठापुढे आज दिनांक २७,मंगळवार रोजी महत्त्वपूर्ण सुनावणीला सुरुवात होणार आहे. या सुनावणीचे सर्व सामान्य नागरिकांना थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील सत्ता संघर्ष पाहायला मिळत असतांना आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष आहे.सुप्रीम कोर्टाच्या http://webcast.gov.in/scindia/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही आज लाईव्ह सुनावणी पाहू शकता.
या मुद्यावर होणार सुनावणी….
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करणे,परस्परांविरोधात याचिका तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड या याचिकांसोबत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी करण्याची संमती देणे या मुद्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकते.
सर्व सामान्यांना थेट लाईव्ह पाहता येणार….
या सर्व मुद्यावर घटनापीठ आज सुनावणी दरम्यान काय निर्णय घेणार, हे सुनावणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे. खरी शिवसेना कुष्णाची हा मुद्दा महत्त्वाचा असल्याने निवडणूक चिन्हाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या वेळी विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संघर्षावर होतं असलेल्या महत्त्वाच्या खटल्याचे पहिल्यांदाच सर्वसामान्य नागरिकांना कोर्टातील कामकाज थेट लाईव्ह पाहता येणार आहे.