मुंबई,(प्रतिनिधी)- पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर असून ( maharashtra Police) पोलीस विभागात आणखी २० हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन भरतीची प्रक्रिया राबवली जाण्याचे संकेत आज देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज सायबर सुरक्षेचा आढावा बैठक घेतली बैठकी नंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी देखील माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान पोलिस विभागातील भरतीबाबत या पूर्वी ७ ते ८ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहीरात काढण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी १२ हजार पदांसाठीची जाहीरात लवकरात लवकर काढण्यात येईल. या भरतीमुळे पोलिस दलाला चांगली मदत होईल. या भरतीसाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचं यावेळी दवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.