जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात तसेच आरोग्य क्षेत्रात नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, जळगाव येथे विविध पदांची भरती करण्यात येणार आहे.झेडपीच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक संवर्गाची भरती होणार आहे.आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गाची भरती प्रक्रिया जिल्हा पातळीवरच राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
बिंदू नामावली तपासणीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे
आरोग्य विभागातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील पाच पदांचा समावेश आहे. त्याचे वेळापत्रक सुद्धा जाहीर झाले असून, बिंदू नामावली तपासणीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आली आहे.त्यामुळे लवकरच पदभरती होणार आहे.
असे असणार वेळापत्रक
•२३ ते २७ सप्टेंबर – संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीला कळवणे
•२८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर – जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासाठी कार्यवाही करणे.
•५ ते २० ऑक्टोबर- गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे.
•२५ व २६ ऑक्टोबर – परीक्षेचे आयोजन
•२७ ते ३१ ऑक्टोबर- अंतिम निकाल नियुक्ती आदेश
नोकरीच्या बातम्या वाचा….क्लिक करा…
जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी
धुळ्यात 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी.. इतका पगार मिळेल, कसा अर्ज कराल?
विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती; 10वी पासही अर्ज करू शकतात, 92000 पगार मिळेल
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्रमध्ये 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी..
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये मोठी भरती ; 1 लाखापर्यंतचा पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती