मुंबई । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी काल पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा शेळी कधी झाला?”, असा सवाल कदम यांनी विचारला आहे.
रामदास कदम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिंदे गटात जाण्यापूर्वी सर्वात अगोदर खोतकरांनी मला फोन केला होता, पण मला असं काही बोलेल नाहीत. हा एवढा घाबरट कधीपासून झाला? खोतकरांना मी वाघ समजत होतो, असे कदम यांनी म्हंटले.
हे पण वाचा :
सोने खरेदीदारांना झटका, सलग दुसऱ्या आठवड्यात वाढले इतके भाव?
संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ; चौकशीसाठी ईडीचं पथक पोहोचलं घरी
1 ऑगस्टपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम
शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! भोसरी भूखंड प्रकरणाचा तपास एसीबीकडे
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या ईडी चौकशीबाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतली आहे. युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का त्यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वार्थ साधला आणि आमदारांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप कदम यांनी केला आहे.