मुंबई : या आठवड्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.भारतात सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचे दर वधारले आहे. या आठवड्याभरात सोन्याच्या दरात 782 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. या आठवड्यात सोन्याचे दर 51,426 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. गेल्या आठवड्यात हाच दर 50,644 रुपयांवर बंद झाला होता .
चांदीच्या दरामध्ये , स्थानिक बाजारातील एमसीएक्सवर(MCX), चांदी (Silver Price Today) साप्ताहिक आधारावर 5.88 टक्क्यांनी वाढून 58,370 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तीन आठवड्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 9.47 टक्क्यांच्या वाढीसह 20.32 डॉलर प्रति औंसवर बंद झाली. गेल्या पाच आठवड्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे.
दुसऱ्या सहामाहीत सोने वाढण्याची अपेक्षा
सोन्या-चांदीच्या दर वाढीबाबत आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 आधार अंकांची वाढ केली आहे. पण सप्टेंबर आणि त्यानंतर व्याजदरात तेवढी आक्रमक वाढ न करण्याचा दिलासा मध्यवर्ती बँकेने दिला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सलग दुसऱ्या तिमाहीत घसरली. त्यामुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे.
हे पण वाचा :
संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ; चौकशीसाठी ईडीचं पथक पोहोचलं घरी
1 ऑगस्टपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम
शिंदे सरकारचा खडसेंना धक्का! भोसरी भूखंड प्रकरणाचा तपास एसीबीकडे
8 वी ते 10 वी पाससाठी सरकारी नोकरी उत्तम संधी.. लगेचच अर्ज करा
हा आठवडा सर्वात मजबूत
सोन्यासाठी गेल्या पाच महिन्यांतील हा सर्वात मजबूत आठवडा ठरला आहे. तसे पाहता अमेरिकेची अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट पसरले आहे. जून तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था 0.9 टक्क्यांनी घसरली. पहिल्या तिमाहीत ही घट 1.6 टक्के होती. जागतिक अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीत सराफा बाजारात सोन्याची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे मत आहे. दुसऱ्या सहामाहीत सोन्याची मागणी वाढण्याची आणि सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.