नवी दिल्ली : एका मल्याळम अभिनेत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. सरथ चंद्रन असे या अभिनेत्याचे नाव असून शुक्रवारी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सरथच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे, ज्यामध्ये त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असं लिहिलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
त्याने ‘अंगमली डायरीज’, ‘कुडे’ आणि ‘ओरू मेक्सिकन अपरथा’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कक्कड इथल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. सरथने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून तो नैराश्यात होता आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सूचित होतं आहे, असं पोलिसांनी सांगितलं. सरथ चंद्रनच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता अँटोनी वर्गीसने ‘अंगमली डायरीज’मधील सरथचे काही फोटो शेअर करत ‘RIP ब्रदर’ असं लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सरथच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :
अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, पण तो.. रामदास कदमांची घणाघात
सोने खरेदीदारांना झटका, सलग दुसऱ्या आठवड्यात वाढले इतके भाव?
संजय राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार ; चौकशीसाठी ईडीचं पथक पोहोचलं घरी
1 ऑगस्टपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम
अभिनेता अँटोनी वर्गीसची पोस्ट
37 वर्षीय सरथ हा ‘अंगमली डायरीज’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने ‘कुडे’, ‘ओरू मेक्सिकन अपराथा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मूळचा कोची इथला असलेला सरथ चंद्रन याने सुरुवातीला एका आयटी फर्ममध्ये काम केलं. त्यानंतर डबिंग कलाकार म्हणून त्याने चित्रपटांमध्ये काम केलं. सरथने मल्याळम चित्रपटसृष्टीत अनिस्या या चित्रपटातून पदार्पण केलं.