जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघावर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून दूध संघातील भ्रष्टाचाराच्या चौकशीकामी समिती गठीत करण्यात आली आहे. या पाश्वभूमीवर आज एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. आ.महाजन यांच्याकडून दूध संघावर राजकीय द्वेषापोटी समिती गठीत केल्याचा आरोप खडसे यांनी केला.
राजकीय हेतूने आ.गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केले जात आहे. असे खडसे म्हणाले आहे.
संचालक मंडळ बरखास्त करायचे होते तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते. परंतु असे काहीही झालेले नाही. कारवाई बेकायदेशीर आणि राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असा आरोप माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केला आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटते. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर तर सरकार कोसळू शकते, असे खडसे म्हणाले.
हे पण वाचा :
दहावी फेल तरुण इंस्टाग्राम फोटोंवरून बनवायचा पॉर्न व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागायचा पैसे
काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न
धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार
अब्दुल सत्तारांना खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! वेळही केली जाहीर
राज्यात शिंदे-भाजपचे नवीन सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही. दोन व्यक्ती राज्यकारभार पाहत आहेत, हे असं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर व्हायला पाहिजे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावे. राज्यात अजूनही पालकमंत्री नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विकास काही प्रमाणात थांबला असून विकास कामांना वेग दिला पाहिजे.असेही ते म्हणाले.