अमळनेर : अमळनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कोरोनाच्या काळात पतीचे निधन झाल्यामुळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणताही उपाय नसल्याने एक महिलाने पोटच्या मुलांना विक्री करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र तिचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पडला आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली.
काय आहे घटना?
अमळनेर शहरातील गांधीलपुरा भागात एक महिला आपल्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी महिला पोलीस नजमा पिंजारी, दीपक माळी आणि रवींद्र पाटील यांना पाठविले. या पथकाला संबंधीत महिला आढळून आल्याने तिला पोलीस स्थानकात नेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधीत महिलेचे नाव मीराबाई देवा गायकवाड (वय ४० वर्षे ) असून तिच्यासोबत चार मुले आणि तीन मुली होत्या. कोरोनाच्या काळात आपल्या पतीचे निधन झाल्यामुळे आपल्यासह मुलांना खाण्यासाठी काहीही नसल्याने आपण मुलांना विकत असल्याची धक्कादायक माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र असे करणे बेकायदेशीर असून भविष्यात ती तिच्या मुलांना विकण्याची शक्यता गृहीत धरून या सातही बालकांना तपासणी करून बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार
लग्नानंतर शून्य रिस्कवर उघडा ‘हे’ खाते! दरमहा मिळतील 4950 रुपये
‘या’ कारणामुळे गिरीश महाजनांनी घेतली अमित शहांची भेट
क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज
दरम्यान, बालकांना विकणे आणि विकत घेणे हा कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा असून कुणी असे करू नये. असे करतांना आढळून आल्यास याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.