चंद्रपूर : राज्याचे माजी उपमु्ख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. राजकीय सभांसह सभागृहातही बोलताना अजित पवार आपल्या खास शैलीतून विरोधकांना फटकारत असतात. वेळोवेळी ते कार्यकर्त्यांतचेही कान टोचत असतात. यादरम्यान, चंद्रपुरात अजितदादांसोबत एक प्रसंग घडला ज्यामुळे दादा अत्यंत संतापले आणि पदाधिकाऱ्यावर चांगलेच बरसले.
अजित पवार हे चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी गेले होते. धानोरकरांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थावरुन निघताना अजित पवारांना अनेक पदाधिकाऱ्यांनी, पत्रकारांनी घेरलं. तेव्हा अजित पवार हे सर्वांशी बोलून, त्यांच्या हातातील पुष्पगुच्छ स्वीकारुन गाडीत बसायला जात होते. तेवढ्यात त्यांच्या दारापुढे दीपक जयस्वाल हे ज्येष्ठ पदाधिकारी त्यांना दिसले.
दादा दीपक जयस्वाल यांना इशारा करत म्हणाले की ‘तुला गाडीत बसायला सांगितलं होतं.’ त्यावर दीपक जयस्वाल यांनी नाराजीच्या सुरात अजित पवारांचं आपल्याकडे लक्ष नसल्याची तक्रार केली. आता मात्र, अजितदादा संतापले. त्यांनी आवाज चढवत पदाधिकाऱ्याला असं परत न बोलण्याची तंबी दिली आणि गाडीत बसले.
हे पण वाचा :
दहावी फेल तरुण इंस्टाग्राम फोटोंवरून बनवायचा पॉर्न व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागायचा पैसे
काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न
धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार
अब्दुल सत्तारांना खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! वेळही केली जाहीर
अजित पवार आणि दीपक जयस्वाल यांच्यातील संभाषण –
– अजितदादा: अरे तुला बसायला सांगितलं होतं ना गाडीत
-दीपक जयस्वाल: बसलो होतो न गाडीत… लक्षच नाही न तुमचं पण
– अजितदादा: एक मिनिट असं बोलायचं नाही… मी सगळ्यांशी बोलतोय… मी तसला माणूस नाही…