पाचोरा प्रतिनिधी | पाचोऱ्यातील २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
शिवाजी नगरमधील रहिवासी चेतन भगवान भोसले (वय २५) या तरुणाने २१ रोजी दुपारी घरात कुणीच नसताना छताला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांचे भाऊ आकाश भगवान भोसले यांच्या लक्षात आला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. भोसले यांनी आत्महत्या का केली, यामागील कारण समजले नाही.
मृत चेतन भोसले हे ट्रकचालक असून त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, १ मुलगा, भाऊ, ३ विवाहित बहिणी असा परिवार आहे. याबाबत पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे. तपास हवालदार रवींद्र बत्तीसे करत आहेत.