पाचोरा प्रतिनिधी | गाळण येथील सासर असलेल्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. विवाहितेच्या सात वर्षीय मुलामुळे ही घटना उजेडात आली.
अंतुर्ली खुर्द येथील पूनम नामदेव पाटील यांचा १० वर्षांपूर्वी गाळण येथील संदीप सोनवणे यांच्याशी विवाह झाला होता. पती बाहेरगावी इलेक्ट्रिक फिटिंगसाठी गेले हाेते. तर दुपारी पूनम व त्यांचा ७ वर्षांचा मुलगा भाविक हे घरी हाेते. याचवेळी पूनम हिने झोक्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मुलगा भाविक याच्या लक्षात येताच त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली.
पूनम पाटील यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत पूनम सोनवणे यांच्या पश्चात पती, १ मुलगी, १ मुलगा, सासू, सासरे, जेठ असा परिवार आहे.