मुंबई : आज सलग 16 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात 15 पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत. IOCL च्या मते, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लीटर आहेत. तर आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता.
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही
पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 45 व्या GST काउन्सिल बैठकीनंतर वित्त मंत्री निर्मला सीमारामन यांनी यामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काउन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, जीएसटी काउन्सिलने सांगितलं की, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची ही योग्य वेळ नाही.
काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?
>> दिल्ली पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर
>> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर
>> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर
>> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर
>> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर
SMS च्या माध्यमातून तपासा इंधनाचे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.