पाचोरा,(प्रतिनिधी) – शहरातील बाहेरपुरा भागात असलेली तीन मजली इमारत क्षणात कोसळली या इमारतीचा कोसळतांनाचा व्हिडीओ देखील व्हयरल झाला आहे.सोमवार २० सप्टेबरच्या रात्री सुरु असलेल्या रिमझीम पावसामुळे ही इमारत अखेर कोसळली.
मुंबई येथील साजेदाबी शेख खलील यांच्या मालकीची ही इमारत असल्याचे समजते.या तीन मजली इमारतिचे गेल्या पाच वर्षापुर्वी बांधकाम करण्यात आले होते मात्र बांधकाम वेळी काही तांत्रिक दोष राहिल्यामुळे या इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले होते. दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेत भाडेकरू यांनी सदर इमारत आधीच रिकामी करुन केलेली होती त्यामुळे कुठलीच जीवितहानी झाली नाही.