सावधान..! कोरोना संसर्ग वाढतोय,आपल्याला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेळीच रोखायचा आहे. योग्य काळजी हाच उपाय असल्यानं ‘सोशल डिस्टन्स'(social distance)पाळणे आवश्यक असून नियम पाळण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांनी ट्विट करून केलं आहे.
चिंताजनक म्हणजे राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तुटता तुटेना अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे वास्तव आहे.विकेंड लॉकडाऊन, कठोर निर्बंध लागू असून रस्त्यांवर शुकशुकाट झाला आहे. तथापि, नव्याने बाधित होणारांची संख्या मात्र कायम आहे. दररोज नव्याने कोरोना बाधितांची संख्या अचंबित करणारी असल्याने राज्य शासनही कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असल्यास एका व्यक्तीचा इतरांशी होणारा संपर्क कमी करावा लागेल, संपर्क वाढल्याने कोरोना संसर्ग कसा वाढू शकतो याबाबत खासदार शरद पवार यांनी ग्राफिक्स द्वारे ट्विट करून ‘सोशल डिस्टन्स’ पाळण्याबाबत आवाहन केलं आहे.
