रावेर/प्रतिनिधी:-(विनोद कोळी)- पुनखेडा गावात जिओ टॉवर बसवले असून परीसरात येथे मोबाईल नेटवर्क,रेंज मिळत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे शेतकरी ,व्यापारी यांना हरभरा, केळी कापणी, वाहतूकीसह अन्य कारणांमुळे संपर्काअभावी ताळमेळ बसत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे मोबाईल नेटवर्क रेंज मिळत नसल्याने नुकसानीसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
सध्या पुन्हा कोरोना महामारी संकट काळ असल्याने शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे त्यातच काही विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता मोबाईल द्वारे ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा आधार घेत पाठ्यक्रम करण्याची योजना आखत आहे.मात्र गावातील मोबाईल टॉवर्स शोपिस ठरले असून मोबाईल ला नेटवर्क व रेंज मिळत नाही व मधेच फोन कट होत असल्याने संभाषण अभावी नागरिकांचा संताप वाढत आहे ? संबंधित मोबाईल कंपनीच्या अधिकारी सह विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही तरी दुरसंचार,जिओ विभागाचे वरिष्ठ अधिकारीसह संबंधितांनी तातडीने लक्ष देवून जनसामान्य जनतेसह विद्यार्थी, शेतकरी व्यापारी यांना नाहक होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह गावकरी तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद कोळी यांनी केली आहे.

