Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

उत्तर महाराष्ट्र व नांदेड विध्यापिठाचे माजी कुलगुरूंची उपस्थिती ; ८११ स्‍नातकांना पदवी बहाल

najarkaid by najarkaid
April 10, 2023
in जळगाव
0
“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, ता. १० : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचा “ऑटोनॉमस” झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीप्रदान सोहळा दिनांक १० एप्रिल सोमवार रोजी महाविद्यालयाच्या ऑडीटोरीयममध्ये सकाळी ११ च्या सुमारास संपन्न झाला.

या सोहळ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर, कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी तर रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ. शेखर रायसोनी, विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती, प्रा. राहुल कुलकर्णी, सॅनट्रोनिक्स प्रा. ली. या आयटी कंपनीचे संचालक उमेश सेठिया, रायसोनी महाविद्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, परीक्षा नियंत्रक अविनाश पांडे, प्रा.रफिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले. या समारंभाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे व्हिजन व महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय “स्वायत्त” या एक्सलन्स पातळीला गाठू शकले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडली नाही तसेच नवनवीन उद्योग विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील असल्याने आपल्या भागातील विध्यार्थ्यांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज भासत नाहीए तसेच २०२०-२१ व २०२१-२२ या काळात बरेचेसे सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहेत. डाटा सायन्स, ब्लॉक चैन टेक्नोलॉजी, बिजनेस अॅनलीटीक्स यासारख्या कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीच्या ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहे. तसेच आपल्या भागातील बहुतांश मुले ही फॅमिली मॅनेज बिजनेस पार्श्वभूमीतून येतात त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक उद्योगाला पुढे नेण्याची जबाबदारी त्याच्यावर असते त्यामुळे विध्यार्थ्यानी सर्टिफिकेट कोर्स इन फॅमिली मॅनेज बिजनेस हा कोर्स केल्यास नक्कीच त्यांना आपल्या उद्योगात फायदा होईल. या कोर्ससाठी रायसोनी महाविध्यालयाने एशियन इस्टीट्यूट ऑफ फॅमिली बिजनेस मॅनेजमेटसोबत करार केले आहे तसेच महाविध्यालयात ऑल इंडिया मॅनेजमेट असोसिएशनसोबत करार करून बिजनेस सिम्युलेशन लॅब स्थापन करण्यात आली आहे.

येत्या काळात समाजाच्या, उद्योगाच्या व इतरांच्या ज्या आमच्या रायसोनी इस्टीट्यूट कडून अपेक्षा आहेत त्या आम्ही निश्चितच पूर्ण करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले कि, नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तुम्हा तरुणांनी पुढील आयुष्यात करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते तसेच आता या वयातच फिटनेसची सवय लाऊन घ्या व आपले छंद झोपासा, रायसोनी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला असून नॅक “ए” ग्रेडनेही हे इस्टीट्यूट सन्मानित आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भागातील विध्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर यांनी नमूद केले कि, माणसाच्या मनात कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती असेल तर तो जगातील कोणतेही मानाचे स्थान प्राप्त करू शकतो. विद्यार्थी जीवनात कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती असू द्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. आपण आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. आयुष्यामध्ये येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत, संघटित होऊन काम केले पाहिजे.

हाच आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे असे त्यांनी यावेळी म्हटले, यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून मागील वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या एमबीएचे १८९, आयएमसीएचे ७५, एमएमएसचे ०७, बीबीएचे २५९, बीसीएचे २५९, डीएमसीएचे २२ असे सर्व शाखेचे एकूण ८११ पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. अंजली बियाणी यांनी केलेत तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातून मागील वर्षी शिकून गेलेले पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१० विद्यार्थ्यांनी केली सुवर्ण पदकांची कमाई
एमबीए-२०२०-२१ यावर्षात कपिल बटूसिंग परदेशी तर २०२१-२२ मध्ये ज्ञानल रवींद्र बोरोले, आयएमसीए-सागर कांतीलाल पाटील, एमएमएस-आशिष शामलाल कुकरेजा, बीबीए-२०२०-२१ यावर्षात मुस्कान सुनीलकुमार मंधान तर २०२१-२२ मध्ये ख़ुशी गणेश रावलानी, बीसीए-२०२०-२१ यावर्षात लिसा महेश मांधवाणी तर २०२१-२२ मध्ये दिप्ती धनराज जाधव , बीसीए इंटेग्रेटेड- निकिता सुनील रायपुरे, ड्युअल एमसीए-साक्षी कमलेश अग्रवाल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे बंपर भरती जाहीर, योग्य पात्रता जाणून घ्या?

Next Post

मु.जे.महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
मु.जे.महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

मु.जे.महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us