Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली – बाळासाहेब कर्डक

भुसावळ येथे महात्मा फुले समता परिषद आयोजित 'ओबीसी आरक्षण पे चर्चा' कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मत

najarkaid by najarkaid
July 17, 2021
in Uncategorized
0
स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली – बाळासाहेब कर्डक
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – स्वातंत्र्याची लढाई ही सर्व ओबीसी बांधवांनी लढल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपविण्याचा घाट सुरु आहे. हे कदापी आम्ही होऊ देणार नाही, असे परखड मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्यासह भुसावळ येथील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.

भुसावळ येथे माळी भवनमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ‘ओबीसी राजकीय आरक्षण पे चर्चा’ या बैठकीचे आयोजन आज शनिवार दि. 17 रोजी दुपारी 12 वा. करण्यात आले होते.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक नाळे, निरीक्षक आशिष शेलार, सर्वोच्च न्यायालयाचे वकील ऍड. प्रतिक कर्डक, महात्मा फुले समता परिषदेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, राष्ट्रवादीचे प्रा. डॉ.सुनील नेवे सर, शिवसेनेचे दीपक धांडे, शहरप्रमुख बबलू बराटे, भाजपचे शिशिर जावळे, झेंडूजी महाराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले समता परिषदचे तालुकाध्यक्ष संतोष माळी यांनी केले.

प्रा.डॉ. नेवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी उदासीनता झटकून एकत्र येऊन ओबीसी राजकीय आरक्षणात सहकार्य केले पाहिजे तसेच उपलब्ध इंपेरिकल डेटा वर काम करून ओबीसी समाजास त्वरित न्याय दिला पाहिजे असे मत राष्ट्रवादी कँग्रेस पार्टीचे प्रा.सुनील नेवे यांनी मांडले. भाजपचे शिशिर जावळे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाच्या सर्वागिण विकासासाठी, न्याय हक्कासाठी सर्व पक्ष, सामाजिक संघटना यांनी आपले हेवेदावे, वैचारिक मतभेद विसरून एकत्र यावे. व ओबीसी समाजाला आता खऱ्या अर्थाने जागवायचीव जगवायची वेळ येऊन ठेपली असून ओबीसी आरक्षण संदर्भातील चळवळ अधिक प्रगल्भ करावी असे शिशिर जावळे यांनी सांगितले.

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणू पाहणाऱ्या प्रवृत्तीना शिवसेना स्टाइल उत्तर देऊन आरक्षण मिळणारच असल्याचे शिवसेनेचे युवा नेते माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी याप्रसंगी मनोगतातून सांगितलं.

ओबीसी आरक्षणात विलंब होण्यासाठी तसेच ओबीसीचे राजकीय नेतृत्व संपविणारे कितीही विद्वान पंडित अडथळे आणो.. आमच्या अंगावर आल्यास शिंगावर घेऊ.. असा इशाराही संत झेंडुजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार युवक मंडळ भुसावळचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी दिला.अखिल भारतीय लेवा पाटीदारयुवा विकास महासंघ विद्यार्थी संघटना चे जळगाव जिल्हा अध्यक्ष एडवोकेट सागर सरोदे यांनी याप्रसंगी ओबीसी समाजाच्या हितासाठीच्या, न्याय हक्कासाठी च्या प्रत्येक लढाईमध्ये आंदोलनाना जाहीर पाठिंबा देत असल्याच जाहीर केले.

या कार्यक्रमाला ऍड. सागर सरोदे, वसंतराव कोलते, एसटी महामंडळ चे धर्मराज देवकर, किशोर पाटील, सचिन बराटे, गिरीश पाटील, सागर वाघोदे, संजय बऱ्हाटे,महालक्ष्मी ग्रुप भुसावळचे सर्व पदाधिकारी तसेच कैलास बंड, माळी महासंघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष विजय माळी, वरणगाव शहर अध्यक्ष सचिन माळी, गजानन माळी, सुधाकर माळी, देवेंद्र वराडे, चंद्रशेखर पाटिल,आदी उपस्थित होते. आभार प्राचार्य धीरज पाटील सर यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय मानवाधिकार परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना अनोखे निवेदन , शहरात इंटरनेट व वाय फाय सुविधा मिळण्याची मागणी

Next Post

राजेश पाटील- आमदार किशोर अप्पांचे निष्ठावान स्वामीभक्त

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
राजेश पाटील- आमदार किशोर अप्पांचे निष्ठावान स्वामीभक्त

राजेश पाटील- आमदार किशोर अप्पांचे निष्ठावान स्वामीभक्त

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us