Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल शेती विकत घेण्यासाठी अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?

Editorial Team by Editorial Team
December 21, 2022
in राज्य
0
सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल शेती विकत घेण्यासाठी अनुदान, अर्ज कुठे आणि कसा कराल?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. यातच ज्या शेतकर्‍यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 असे या योजनेचे नाव असून ही योजना राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना जमिनीची खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरु करण्यात आली.  तर चला जाणून घेऊयात.. अर्जाच्या अटी, पात्रता, लाभ,कागदपत्रे अर्ज कुठे करावा या सर्व गोष्टींची माहिती.

या योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना राज्यशासनाकडून जमिन खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी कर्ज स्वरूपात व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी, भुमीहीन शेतमजूर यांच्यासाठी शासनाकडून शेतजमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांतील पती अथवा पत्नीच्या नावे केली जाते. लाभार्थी विधवा किंवा परितक्त्या स्त्री असेल तर जमीन त्यांच्या नावे केली जाते. चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.

भूमिहीन योजनेच्या अटी –
लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी १८ व जास्तीती जात वय ६० वर्षे निश्चित केले आहे.
विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीयांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.
जमीन खरेदी करताना तीन लाख रूपये प्रती एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही किंवा विकता येत नाही.
महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, अश्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
या योजनेअंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभधारकाने जमीन स्वत: कसणे गरजेचे असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक असणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी १० वर्षे मुदतीसाठी असणार आहे.
कर्जफेडीची सुरूवात कर्ज मंजुरीनंतर २ वर्षांनंतर सुरू होणार आहे.
कुटूंबाने विहीत मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून १० वर्ष्यात कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –
अर्ज विहीत नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा.
अर्जदाराने अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र
रहिवाशी दाखला
रेशन कार्ड झेरॉक्स,
आधार कार्ड झेरॉक्स,
निवडणूक कार्ड प्रत
भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार दाखला
मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
वय ६० वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.

अर्ज कुठे करावा –
वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यास पात्र असल्यास संबंधित जिल्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इन्स्टाग्रामवरील ओळख महागात पडली ; इंजिनीअर तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवून फसवणूक

Next Post

दुचाकी घेण्याचा विचार करताय? Bajaj ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक, जाणून घ्या फिचर?

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दुचाकी घेण्याचा विचार करताय? Bajaj ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक, जाणून घ्या फिचर?

दुचाकी घेण्याचा विचार करताय? Bajaj ने लाँच केली स्वस्त आणि मस्त बाईक, जाणून घ्या फिचर?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us