Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने म्हणून…जामनेर भाजपाचे दिलीप खोडपे यांचा राजीनामा

najarkaid by najarkaid
September 16, 2024
in Uncategorized
0
सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने म्हणून…जामनेर भाजपाचे दिलीप खोडपे यांचा राजीनामा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  जामनेर भाजपाचे जेष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने, मूळ विचार व ध्येयधोरणांपासून जामनेर तालुक्यात स्वतःच्या डोळ्यासमोर दूर जात असलेला पक्ष याला कंटाळून, माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा दिल्याचं जामनेर भाजपा तालुकाध्यक्ष यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

राजीनामा पत्र वाचा जसेच्या तसे 

मागील ३५ वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. जेव्हा पक्षाची परिस्थिती अतिशय खराब होती व टोकाचा संघर्ष करायचा होता, तेव्हा तो संघर्ष मी पक्षाच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांसोबत केला. मी कधीही पक्षाकडे पद अथवा लाभाची कामे मागितली नाहीत. मी आणि माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संघर्षामुळे मला ते आपसूकच मिळत गेले, तर बऱ्याच वेळेस माझे कार्यकर्ते व सहकाऱ्यांसाठी मी अनेक पदांचा त्यागही केला. परंतु मागील दहा वर्षापासून पक्षामध्ये स्वकर्तृत्वाने मोठे होण्यापेक्षा दुसऱ्याला नालायक ठरवून मोठे होण्याची स्पर्धा सुरू झाली.

पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांपासून दूर जाऊन कार्यकर्त्यांना डावलण्यात, स्वतःचे खिसे भरण्यात, प्रत्येक गावात पक्षाचे दोन गट उभे करण्यात व दडपशाही करण्यातच पक्षातील लोक व्यस्त असल्याचे मागील दहा वर्षांपासून दिसून आले. गावागावात दोन गट उभे करून आपापसातच वाद लागल्यामुळे पक्षाचेही खूप नुकसान झाले. पक्षाचे नियम व ध्येयधोरणे हे अस्तित्वातच नाहीत असे चित्र आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहे.

भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर व बदलापूर येथील चिमुकलीच्या तसेच एकापाठोपाठ महाराष्ट्रभरात घडत असलेल्या बलात्कार प्रकरणात आपल्या तालुक्यातील पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही, उलटपक्षी प्रकरण सारवासारव करण्यातच सगळे प्रयत्नशील असल्याचे दिसून आले. मी या बाबतीत निषेध नोंदवला असता माझ्या बाबतीत उलट सुलट चर्चा केल्या गेल्या.

दहीहंडी उत्सवा दरम्यान आपला अतिशय जवळचा कार्यकर्ता कैलास पालवे याचा अपघात होऊन त्याला अत्यवस्थ अवस्थेत आपण दवाखान्यात खाना केले, परंतु आपला एक कार्यकर्ता जीवन मरणाशी संघर्ष करत असताना आपण कार्यक्रम जल्लोषात नाच गाणे करून साजरा केला. यावरून कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सामील होण्याच्या आपल्या पक्षाच्या विचारालाही हरताळ फासली गेली. तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, नोकरदारांचे, महिलांचे प्रश्न असतील असे एक ना अनेक विषय मागील दहा वर्षांमध्ये मनाला बोचत होते परंतू ते येथे सविस्तरपणे सांगणे शक्य होणार नाही. या परिस्थितीत सुधारणा होईल या आशेने मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत राहिलो. मागील ५ वर्षांपासून माझ्या बाबतीत प्रचंड गैरसमज पसरवले गेले आणि हे गैरसमज आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांनी पसरवले. असे असूनही मी प्रामाणिकपणे व एकदिलाने पक्षाचे काम अविरतपणे सुरूच ठेवले. या सर्व गोष्टी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना माहीत असूनही मला पक्षात अपेक्षित सन्मान कधीही मिळाला नाही व माझ्या बाबतीत उलट सुलट चर्चा चालूच राहिल्या, म्हणजेच या गोष्टींना वरिष्ठांचा आशीर्वाद आहे असे दिसून येते. वेळोवेळी मी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमधून व सभांमधून सर्व कार्यकत्यांसमोर पक्षात सुरू असलेली चमकोगिरी, प्रसिद्धीची हाव, कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष व पैशांना पक्षात आलेले महत्त्व या गोष्टींना उजाळा दिला.

तरीही यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही. मागील अनेक वर्षांपासून मला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही.

हा निर्णय घेताना मला किती वेदना होत असतील याची कदाचित आजचे कार्यकर्ते कल्पना करू शकणार नाही, कारण गेल्या ३५ वर्षातला संघर्ष व त्या संघर्षातून उभे केलेले हे संघटन सोडून जाणे खूप क्लेशदायक आहे. माझ्या या प्रवासात मला एवढे मोठे करणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मी आजन्म ऋणी असेल. जामनेर तालुक्यातील जनता, माझे सर्व जिवाभावाचे सहकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवेत हजर असेल. माझा कोणत्याही नेत्यावर अथवा पदाधिकाऱ्यांवर राग किंवा आकस नाही. परंतू, सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने, मूळ विचार व ध्येयधोरणांपासून जामनेर तालुक्यात स्वतःच्या डोळ्यासमोर दूर जात असलेला पक्ष याला कंटाळून, माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा देत आहे. धन्यवाद.

आपला

श्री. दिलीप बळीराम खोडपे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार ; खडसेंच्या भाजपा प्रवेशावर मंत्री गिरीष महाजणांचं मोठं वक्तव्य

Next Post

घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Next Post
घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या - पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us