Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्याच्या कुटूंबाला सुरक्षा देणारी अनुदान योजना ; तुम्हीही शेतकरी असाल तर घ्या त्वरित जाणून

Editorial Team by Editorial Team
May 24, 2023
in जळगाव
0
सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळाचा बनेल आधार ; दरवर्षी मिळणार ३६ हजार रुपये
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेकदा शेतक-याचा मृत्यु ओढवतो किंवा काहीना अंपगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थीती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतक-यास/त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेल्या शेतक-यांच्या कोणत्याही एक सदस्य (आई, वडील, शेतकरीची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांपैकी कोणतीही एक असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही योजना १९ एप्रिल, २०२३ पासून आवश्यकतेनुसार प्रथम ३ वर्षे राबविण्यात येणार आहे. अशी माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एक सदस्यांमध्ये आई वडील, शेतकरीची पती पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.

कृषि गणनेनुसार निर्धारीत केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणत्याही १ सदस्य असे एकुण २ व्यक्तींकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुज्ञेय असतील.

अपघातांचा समावेश असणा-या बाबी-
रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यु, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडुन मृत्यु, खुन, उंचावरुन पडुन झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडुन झालेली हत्या, जनाव-यांच्या हल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यु, बाळांतपणातील मृत्यु, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा समावेश असेल.

हे पण वाचा..

बदलतेय हवामान ठरणार डोखेदुखी : राज्यात कुठे पावसाचा इशारा तर कुठे उष्णतेचा अलर्ट

अखेर बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर ; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

सिनेसृष्टी पुन्हा हादरली! फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन

सशस्त्र सीमा बलात बंपर भरती जाहीर ; 10वी,12वीच्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी

अपघातांचा समावेश नसणा-या बाबी-
नैसर्गिक मृत्यु, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, भ्रमिष्ठपना, शरिरातंर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युध्द, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खुन या बाबींचा समावेश नाही.
लाभासाठी आवश्यक कागदपत्रे – ७/१२ उतारा, मृत्युचा दाखला, शेतक-यांचे वारस म्हणुन गावकामगार तलाठयाकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद., वारसदाराचे ओळखपत्र आधारकार्ड/पॅनकार्ड/बँक पासबुक/निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला, जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र/आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना/पारपत्र/निवडणुक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र., प्रथम माहिती अहवाल/घटनास्थळ पंचनामा/पोलिसपाटील माहिती अहवाल., अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे आवश्यक आहे.

जेव्हा शेतक-याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/शेतक-यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करावा. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.

वारसदाराची निवड पध्दत- अपघातग्रस्ताची पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार आदि प्रमाणे निवड करण्यात येईल. असे श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बदलतेय हवामान ठरणार डोखेदुखी : राज्यात कुठे पावसाचा इशारा तर कुठे उष्णतेचा अलर्ट

Next Post

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात या पदांसाठी निघाली भरती ; पगार 21,000 रुपये मिळेल

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! HQ दक्षिणी कमांड पुणे येथे मोठी भरती

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात या पदांसाठी निघाली भरती ; पगार 21,000 रुपये मिळेल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us