- शिवसेनेचे सुनील महाजन यांनी पहिल्याच दिवशी घेतला नामांकन अर्ज
जळगांव – माजी महापौर तथा विद्यमान शिवसेनेचे नगरसेवक डॉ. सुनील महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी अर्ज घेतल्याने शिवसेना या ठिकाणी बंडोखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेला ही जागा मिळोवा न मिळो आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची स्पष्ट भुमिका डॉ. सुनील महाजन यांनी दै. नजरकैदशी बोलतांना व्यक्त केली.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक तथा निकटवर्तीयां मधील असलेले डॉ. सुनील महाजन यांनी जळगाव शहर मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी नामांकन अर्ज पहिल्याच दिवशी घेतल्याने शिवसेना या जागेवर बंडोखोरी करत निवडणूक लढल्यास भाजपाची डोके दुखी होणार आहे.
भाजप व शिवसेना यांची युती होते की नाही याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना लागून होती अखेर भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी युतीला हिरवा कंदिल दिल्याने कायर्र्कर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तसेच वरिष्ठ पातळीवर विद्यमान असलेल्या आमदारांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु काही अपवादात्मक ठिकाणी चर्चा करून तसा बदल करण्यात येण्याचे संकेत वरिष्ठांनी दिले आहे. मात्र काही ठिकाणी दोन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरी होण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आता चिंता सतावू लागली आहे.
महानगर पालिकेचा कारभार चालवित असतांना विद्यमान आमदार राजूमामा भोळे हे शिवसेनेच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता निर्णय लादतात. तसेच नगरसेवकांना उद्दाम पणाची वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर डॉ. सुनील महाजन यांनी केला. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा फक्त वापर करून घेतल्याने नगरसेवकां मध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. तरी भाजपाने विद्यमान आमदारांना उमेदवारी न देता दुसर्याला संधी दिल्यास सेना बंडखोरी करणार नाही.
डॉ. सुनील महाजन
राजकारणात काम करत असतांना लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळून देण्यासाठी सदैव तत्पर असतो याचा अनुभव संपूर्ण जळगावकरांना वेळोवेळी आला आहे. तसेच महानगर पालिकेचा कारभार चालवतांना शिवसेनेच्या नगरसेवकांसह विरोधकांना देखील विश्वासात घेऊनच लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहे. पक्ष जो आदेश देईल ते मला मान्य असतील असे सांगत डॉ. सुनील महाजन यांनी केलेल्या आरोपाचे आ. भोळे यांनी खंडन करीत उद्दामपणाचे संस्कार भाजपाचे व माझे ही नाहीत त्यामुळे कोणाशीही उद्दामपणाने वागण्याचा प्रश्न येत नाही.
आमदार राजूमामा भोळे