Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळेच्या वेळेतच शिक्षक ‘सोशल’

najarkaid by najarkaid
February 17, 2020
in राज्य, शैक्षणिक
0
शाळेच्या वेळेतच शिक्षक ‘सोशल’
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – शालेय वेळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्यासह भविष्याचा वेधही घ्यायला शिकवणे गरजेचे असते. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सोडून, शिक्षक  हातातील मोबाइलमध्ये असलेल्या फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले असून, विविध पोस्ट्स‌‌वरही कमेंट्स करीत असल्याचे निदान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसंदर्भात शिक्षकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेताना हे वास्तव समोर आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने अभ्यासगट स्थापन केला. त्याची पुण्यात बैठक झाली. अभ्यासगटाच्या निमित्ताने आयुष प्रसाद यांनी शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक पेज तयार केले आहे. त्यावर बदल्यांसंदर्भात काही आक्षेप, सूचना करण्यास सांगितले होते. त्यावर त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून, शिक्षकांकडून उत्तरे मागितली होती. त्या फेसबुक पेजवर शाळेच्या वेळेतच शिक्षकांनी कॉमेंट्स केल्याचे आढळून आले आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणितापासून सामान्य विज्ञानापर्यंतची कोडी समजावणे अपेक्षित आहे. त्यांच्या शंका, समस्या दूर करणे, एखाद्या विषयाबाबत विद्यार्थ्याचे आकलन झाले की नाही, याची खात्री करणे अपेक्षित असते. मात्र, विद्यार्थ्यांना काहीतरी धडा देऊन, शिक्षक मात्र सोशल मीडियावर मश्गुल असल्याचे दिसून आले आहे. मात्र, या फेसबुक पेजवर अनेक शिक्षकांनी ऑनलाइन बदली प्रक्रियेवर आक्षेप नोंदविले आहेत. त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांना शाळे आवडावी, शिक्षण आवडावे; तसेच ज्ञानार्जन व्हावे, यासाठी जिल्हा परिषद विविध उपक्रम राबवित असते. मात्र, त्या प्रयत्नांना शिक्षकांच्या कृतीमुळे तडा जात असल्याचे अधोरेखित झाले आहे. यावर पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गांभीर्याने विचार करू लागला आहे.
Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार समांतर चौकशी करणार

Next Post

शाहीन बाग: मध्यस्थीची जबाबदारी या तिघांवर

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
शाहीन बाग: मध्यस्थीची जबाबदारी या तिघांवर

शाहीन बाग: मध्यस्थीची जबाबदारी या तिघांवर

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us