जळगाव ;- संथगतीने काम होत असल्याने शहरातील खड्डे तातडीने बुजविण्यात येऊन तात्काळ कामे करावी यासाठी आज मनपाच्या विभागप्रमुखांची चांगलीच कानउघाडणी महापौर सीमाताई भोळे आणि उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी केली .
आज १७ रोजी बुधवार रोजी शहरातील विविध प्रभागातील प्रमुख रस्ते तसेच कॉलन्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामुळे मागील काही दिवसांपासुन सुरु असलेली अपघात या संबंधी त्वरीत उपाययोजना करणे कामी महापौर सौ.सिमा सुरेश (राजूमामा) भोळे व उपमहापौर अश्विन शांताराम सोनवणे यांनी तातडीने महानगरपालिका विभागप्रमुखांसोबत बैठक घेतली.
बैठकीत सर्व प्रथम शहरातील खड्डेमय रस्त्यांची डांबरीकरण, मुरुम टाकून त्वरेने दुरुस्ती करुन शहर खड्डेमुक्त करणे व दरम्यान काळात शास्त्री टॉवर चौक ते नेरीनाका पर्यत रस्त्याची डागडूगी करण्यात आलेली असून सद्यस्थिती जळकी मिल ते रेल्वे गेट पर्यत रस्त्याची दुरुस्ती कार्यपथावर असल्याचे संबंधितांना सांगितले. अॅबेटींग खरेदी निविदा प्रक्रिया लवकरात लवकर निश्चित करणे, शहर साफसफाई बाबत सद्यस्थितीत असलेल्या मक्तेदारामार्फत कर्तव्यकटाक्षाने कामे करुन घेणे, साफसफाई समाधानकारक नसल्यास दंडात्मक कार्यवाही करुन देय्यके अदा न करणे व एकमुस्त मक्ता प्रक्रिया पुर्ण झालेला असुन मक्तेदारास स्मरणपत्र देवुन त्वरीत शहर साफसफाईची कामे, कचरा संकलन करणे तसेच मनपाचे नादुरुस्त जेसीबी दुरुस्त करुन शहर साफसफाई व इतर कामकाज कार्यान्वीत करणे, प्रशासकिय इमारतीतील चारही उद्वाहके (लिफ्ट) व शहरातील बंदावस्थेतील पथदिवे त्वरीत सुरु करणे बाबत विविध सुचना संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आल्यात तसेच नागरीकांना मुलभूत सेवा पुरविणे कामी पदाधिकारी वारंवार कामांबाबत अधिकायांना सुचना देत असुन सदर कामे करण्यात येत नाहीत. सदर बाब ही प्रशासकिय शीस्तीस धरुन नसुन शहरवासियांना किमान मुलभूत सुविधा देणे संबंधात मनपा अधिकारी यांनी गांर्भीय घ्यावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे अश्या शब्दात सक्त ताकीद देण्यात आल्या.
या प्रसंगी .महापौर सिमाताई भोळे यांचेसह उपमहापौर अश्विन शांताराम सोनवणे,प्रभाग समिती सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेवक कैलास नारायण सोनवणे,विशाल त्रिपाठी, उपायुक्त लक्ष्मिकांत कहार, प्रभारी शहर अभियंता सुनिल भोळे, पाणी पुरवठा अभियंता ,डि.एस. खडके, प्रभाग अधिकारी .व्ही.ओ. सोनवणी, सुभाष मराठे, भास्कर भोळे,श्री.नेहते, राजेंद्र पाटील, दिनानाथ भांबरे आदी मनपा अधिकारी उपस्थित होते.