Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यावसायिक स्पर्धात्मक काळात ग्राहक राजा महत्वाचा घटक -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन

najarkaid by najarkaid
January 13, 2020
in जळगाव
0
व्यावसायिक स्पर्धात्मक काळात ग्राहक राजा महत्वाचा घटक -खा. उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
ADVERTISEMENT

Spread the love

ग्राहक राजा पुरस्काराचे थाटात वितरण : शहरातील दिगग्ज सन्मानित

जळगाव –  आजच्या स्पर्धात्मक काळात उत्पादक व व्यावसायिकांचा उत्साह कायम राहण्याकरिता ग्राहक दृष्टीने ग्राहक राजा पुरस्काराचे केलेले आयोजन स्तुत्य आहे. सर्व क्षेत्रातील ग्राहक राजांच्या सन्मान सोहळा आज मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे व या सोहळ्यास आम्हास उपस्थित राहता आले यांचा आम्हास अभीमान आहे. यापुढे देखील उत्पादक, विक्रेता आणि ग्राहक हे नाते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी उत्पादक आणि विक्रेता यांच्या पेक्षा कांकणभर अधिक महत्वाचा घटक असलेल्या ग्राहक राजाचा सन्मान हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रायलाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज सभागृहात नुकतेच आयोजित केलेल्या ‘तिस-या ग्राहक दृष्टि ग्राहक राजा पुरस्कार सोहळा प्रसंगी व्यक्त केले.

या प्रसंगी व्यासपीठावर आमदार मंगेश चव्हाण , प्रमुख वक्ते लाईफ कोच स्नेह देसाई, पेरेंटींग कोच शिवांगी देसाई,केशव स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, माजी आमदार मनीष जैन, अनुभुती स्कुलच्या संचालिका निशा जैन, रामकृष्ण पब्लीकेशन्स चे संस्थापक अविनाश पात्रीकर, ग्राहकदृष्टीचे संचालक-संपादक मनीष पात्रीकर उपस्थित होते. सुरूवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकराना वंदनकरून ग्राहकदृष्टीचे संचालक-संपादक मनीष पात्रीकर यांनी पाॅवर पाॅइंट द्वारे प्रास्तावीक केले. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानार्थींना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. या सोहळ्याकरीता बँक ऑफ महाराष्ट्र, बुलडाणा अर्बन को-ऑप सोसायटी ली. सोनसखी जेम्स अँन्ड ज्वेलरी व ओकेजन फ्लावर यांचे सहकार्य लाभले.

चार्टड अकाउंटेंट असुनही सामाजिक कार्य करणा-या पंकज दारा, फोर्ड कंपनीच्या विविध माॅडल्सची सर्वाधिक विक्री व त्यानंतर उत्कृष्ट सेवा देणा-या सरस्वती फोर्डचे संचालक धवल टेकवाणी, वसंत सुपरशाॅपच्या माध्यमातून व्यवसाय करताना रोटरी इंटरनेशनलच्या माध्यमातुन सामाजिक कार्य करत असलेल्या नितीन रेदासनी, युवावस्थेत वेगवेगळ्या कंपन्यांची एजंसी समर्थपणे सांभाळत असलेल्या मयुर ट्रेडींगचे संचालक मयुर चौधरी, नाशिक येथील बांधकाम क्षेत्रात सामान्यांकरीता घराची स्वप्न पूर्ण करणा-या पार्कसाईड होम्सचे संचालक मर्जीयान पटेल यांचे प्रतिनिधि मयुरेश लोखंडे, आर एन कुलकर्णी, खान्देश खाद्य संस्कृति करीत प्रसिद्ध असलेल्या गुजरात स्वीट मार्ट चे संचालक निलेश मदाणी, रुट्स, ब्रँन्ड अँन्ड इमेजच्या युवा लेखिका शिवानी गोहील, व लाईफ कोच स्नेह देसाई व शिवांगी देसाई यांना ग्राहकदृष्टी ‘ग्राहक राजा पुरस्कार‘ देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यानंतर ‘यशस्वी पालकत्व‘ या विषयावर लाईफ कोच स्नेह देसाई व शिवांगी देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यात त्यांनी नऊ मुद्यातुन संयुक्त कुटुंब पद्धति, आई, वडील, मुलं यांच्यातील संवाद, वागणुक यासह ‘चेंज युवर लाइफ‘ या विषयावर मार्गदर्शन कले. पारिवारिक जीवन, नाते-संबध, स्वास्थ्य, असीमित धन,सफ़लता, या विषयावरही त्यांनी संवाद साधला.

कार्यक्रम यशस्वीतेकरीता बँक ऑफ महाराष्ट्रचे जनसंपर्क अधिकारी श्री काकडे, बुलडाना अर्बन क्रेडिट सोसायटी ली चे रमेश पवार, चंद्रकांत जगताप, सोनसखी जेम्स अँन्ड ज्वेलरीचे रवींद्र सोमानी, ओकेजन फ्लावरचे डॉ जगमोहन छाबड़ा, शालु छाबड़ा यांचे सहकार्य लाभले तर सौ मंजुषा, आदिती, अवनेश पात्रीकर, स्नेह अकाडमीक सर्व्हीसेस प्रा. ली.चे जनसंपर्क अधिकारी किशोर बडेशिया यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन सौ सोनल जवाहरानी व राजेश जवाहरानी यांनी केले तर आभार अदिती पात्रीकर यांनी मानले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा वकील संघ निवडणूक;अर्ज माघारीचा आज अंतिम दिवस

Next Post

सावरकरांचे विचार तोडून मोडून समाजासमोर आणल्याचे दुःख

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
सावरकरांचे विचार तोडून मोडून समाजासमोर आणल्याचे दुःख

सावरकरांचे विचार तोडून मोडून समाजासमोर आणल्याचे दुःख

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us