Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत न करणाऱ्या बँकांवर पोलीस कारवाई होणार

najarkaid by najarkaid
July 16, 2021
in Uncategorized
0
कृषि विभागाची मोठी योजना ; या योजनेत १० लाख रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मिळू शकते…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 16 – लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बँकांना दिले होते. तथापि, यासाठी तीनवेळा मुदतवाढ देऊनही काही बँकांनी अद्याप शेतकऱ्यांचे खात्यावर अनुदान वितरणाबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने संबंधित बँकांवर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्ह्यासाठी हवामान फळपिक विमा योजना (अंबिया बहार) सन 2019-20 लागू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत आधारनंबर उपलब्ध न होणे, आधार कार्डावरील नाव फॉर्मवरील नावाशी न जुळणे, सर्व्हे नंबर अवैध असणे आदि कारणासाठी विमा हप्त्याची रक्कम 84 शेतकऱ्यांना 8 महिन्यांनी परत करणे. तसेच बँकेव्दारे महसुल मंडळ/गाव/पिक चुकीचे नमुद केल्यामुळे 20 शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यामुळे त्यांचे तक्रार अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले होते.

प्राप्त तक्रारीबाबत 23 फेब्रुवारी, 2021 रोजी आयुक्त (कृषि) व 20 मार्च, 2021 रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती यांचे बैठकीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना तसेच शासन निर्णय 31 ऑक्टो, 2019 मधील मुद्दा क्र. 18-ड 17 मध्ये नमुद केल्यानुसार (बॅंकेने कोणतेही शेतकरी योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाही याची खात्री करावी. जर एखादा शेतकरी वित्तीय संस्थेच्या चुकीमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहीला तर सदर शेतकऱ्याला देय असणारी नुकसान भरपाई अदा करणेची जबाबदारी संबंधित बँकेची राहील) संबंधित बँकेवर जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे.

या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 8 जुन, 2021 रोजी तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत संबंधित बँकांना 30 जुन, 2021 अखेर लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देउनही संबंधित बँकांमार्फत शेतकऱ्यांचे खात्यावर अनुदान वितरणाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. अशा बँकांवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिलेल्या सुचनांनुसार संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
Tags: #कृषी विभाग#जळगाव #लाभार्थी #शेतकरी #बँक
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ योजनेअंतर्गत मिळवा 90 टक्के पर्यंत कर्ज ; व्याजदरातही मिळणार 3 टक्के सूट

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us