Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी

najarkaid by najarkaid
September 13, 2019
in राज्य
0
राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  दहा दिवस मनोभावाने सेवा केल्यानंतर राज्यभरात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी आनंद आणि भारावलेल्या मनाने निरोप दिला. राज्यभरात गणरायाचे शांततेत विसर्जन सुरू असताना अनेक ठिकाणी भक्तांवर मृत्यू ओढवला. मुंबई, कोकणासह राज्यभरात 19 भाविकांना जलसमाधी मिळाली असून, शोककळा पसरली आहे.

अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवायला गेलेल्या इतर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सतीश जाबराव सोळंके, ऋषीकेश बाबुराव वानखेडे, सतीश बारीकराव वानखेडे आणि सागर अरुण शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावं आहेत. गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण बुडाल्याची दुर्देवी घटना राजापूरात दोन ठिकाणी घडली आहे. धोपेश्वर येथे सिध्देश प्रकाश तेरवणकर हा तरुण बुडाला. तर पडवे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरूण बुडाले. कुलदीप रमाकांत वारंग आणि ऋतिक दिलीप भोसले असे बुडालेल्यांची नावे आहेत. आचरा समुद्रामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी आचरा येथे समुद्रात गेलेले प्रशांत तावडे आणि संजय परब गणपती विसर्जन करून माघारी परतत असताना लाटेच्या तडाख्यात पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले.
नगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत घडली. सुरेश शिवराम फिरके आणि त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके अशी मृतांची नावे आहेत. घरगुती गणेश विसर्जनादरम्यान वाशिममधील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. हदगाव तालुक्यातील तामसा गावातलील एका तरूणाचा गणेश विसर्जनाच्या वेळी मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार असं त्या युवकाचं नाव आहे. कुंडनच्या नदी तोल जावून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्पेश प्रकाश जाधव असं मुलाचं नाव असून तो कुंडन गावातील कातकरी वाडी राहाणारा आहे. आगाशिव नगर येथील चेतन शिंदे हा गणेश भक्त कोयना नदीमध्ये वाहून गेला आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी ही घटना घडली. पाण्याच्या प्रवाहामुळे मुलगा सापडला नाही. लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेले आहेत. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही. जुनापाणी येथे शेतातील विहिरीत विसर्जन करीत असताना तरुण बुडाला. गुणवंत गाखरे असं मृतकाचं नाव.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा तोंडघशी

Next Post

एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक

एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us