Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील आयएएस अधिका-यांच्या झाल्या बदल्या बदल्यांमध्ये सर्वाधिक मराठवाड्यातील आयएएस अधिकारी

najarkaid by najarkaid
September 30, 2022
in राज्य
0
राज्यातील आयएएस अधिका-यांच्या झाल्या बदल्या बदल्यांमध्ये सर्वाधिक मराठवाड्यातील आयएएस अधिकारी
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर,(महेश गायकवाड)- महाराष्ट्र राज्यातील ४४ आयएएस अधिका-यांच्या आज बदल्या झाल्या असून, उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे तर उस्मानाबाद चे नवे जिल्हाधिकारी म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल, नांदेडचे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, यांच्यासह जालन्याचे सीईओ मनुज जिंदल, किनटवचे सहायक जिल्हाधिकारी कीर्ती किरन एच पुजार या मराठवाड्यातील आयएएस अधिका-यांचा समावेश आहे. त्यामुळे आता नांदेडचे मनपा आयुक्त म्हणून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. भगवंतराव पाटील, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून वर्धा जि. प.चे सीईओ सचिन ओंबसे नाशिकचे सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना यांची जालनाच्या सीईओपदी आणि कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विकास मिना यांची औरंगाबाद जि. प. सीईओपदी बदली झाली, तर नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली झाली आहे.

सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच आज राज्यातील ४४ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लातूरचे मनपा आयुक्त अमन मित्तल यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून, तर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेंगावकर यांची पुणे येथील बाळासाहेब ठाकरे अ‍ॅग्री बिझनेस आणि ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक पदावर बदली झाली आहे. तसेच नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची, तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. भगवंतराव पाटील यांची नांदेडचे मनपा आयुक्त म्हणून बदली झाली आहे. मात्र, नांदेड मनपा ड वर्गात मोडते. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील हे पदभार स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याशिवाय आयटीबीपी किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्ती किरन एच पुजार यांची रत्नागिरीच्या जि. प. सीईओ, कळवण आयटीबीपीचे विकास मिना यांची औरंगाबाद जि. प.चे सीईओ म्हणून, नाशिक आयटीबीपीचे विकास मीना यांची जालन्याचे जि. प. सीईओ पदावर बदली झाली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील एमएससीईआरटीचे संचालक एम. देवेंदरसिंग यांची बदली झाली आहे. याशिवाय राज्यातील इतर अधिका-यांची बदली झाली आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. मनीष पाटणकर म्हैसकर यांची पर्यावरणीय आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना नागरी उड्डाण, मान्य प्रशासन विभाग, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबईच्या सचिव पदावरुन राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिका-यांच्या बदल्याची यादी
(नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण)

१) श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)
२) विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर)
३) डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई)
४) अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड)
५) डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग)
६) श्रीमती.जयश्री एस. भोज (डीजीआयपीआर आणि एमडी, महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार)
७) परिमल सिंग (प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)
८) राजेश नार्वेकर (महापालिका आयुक्त नवी-मुंबई महानगरपालिका)
९) ए.आर.काळे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई)
१०) अभिजीत बांगर (ठाणे महापालिका आयुक्त)
११) डॉ.विपिन शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)
१२) नीलेश रमेश गटणे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,एसआरए, पुणे.)
१३) सौरभ विजय (सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग)
१४) मिंिलद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ)
१५) अविनाश ढाकणे (मॅनेंिजग डायरेक्टर, दादासाहेब फाळके फिल्मनगरी)
१६) संजय खंदारे (प्रधान सचिव -१ सार्वजनिक आरोग्य विभाग)
१७) डॉ. अनबलगन पी.(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी)
१८) दीपक कपूर, (अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग)
१९) श्रीमती. वल्सा नायर (प्रधान सचिव, गृहनिर्माण)
२०) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग)
२१) मिंिलद म्हैसकर (प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क)
२२) प्रवीणचिंधू दराडे ( सचिव, पर्यावरण विभाग)
२३) तुकाराम मुंढे (आयुक्त एफडब्लू आणि संचालक, एनएचएम, मुंबई)
२४) अनुप कुमार यादव, (सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग)
२५) डॉ. प्रदीप कुमार व्यास (अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग)
२६) डॉ. अश्विनी जोशी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)
२७) दीपेंद्र सिंह कुशवाह (विकास आयुक्त,उद्योग)
२८) अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे)
२९) श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)
३०) मनुज ंिजदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)
३१) सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)
३२) अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)
३३) राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)
३४) श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)
३५) कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)
३६) रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा
३७) विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)
३८) श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)
३९) के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)
४०) कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)
४१) एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)
४२) विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)
४३) राजेंद्र निबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी)
४४) डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्र वाटप

Next Post

आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us