Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना : शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना देणार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय दाखले

najarkaid by najarkaid
June 11, 2020
in जळगाव
0
रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनाही मिळणार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 11  : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका (रेशन कार्ड) नसलेल्या कुटुंबांना सक्षम प्राधिकाऱ्यांचा दाखला तत्काळ उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

श्री. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे, कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये तसेच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा म्हणून मर्यादित कालावधीकरीता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून जे रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड सादर करू शकणार नाहीत, अशांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना , राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई यांचेकडील 5 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार तालुका स्तरावर कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना तहसीलदारांकडून दाखला देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुका कार्यालयांकडून कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

मात्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या काही रुग्णांकडे रेशन कार्ड नसल्याने तहसीलदारांचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने अथवा दाखला वेळेत सादर न करु शकल्याने या योजनेचा लाभ मिळत नाही, असे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून असे दाखले देण्यात येत आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण 33 नोंदणीकृत रुग्णालया मार्फत कोविड-19 रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्याकरीता संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव यांचेमार्फत निर्देश देण्यात आलेले आहेत.

ज्या रुग्णांकडे रेशन कार्ड नसेल अशांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांनी विहीत नमुन्यातील घोषणापत्र रुग्णालय प्रशासनाने भरुन त्यावर कुटुंबातील सदस्याचे पूर्ण नाव व स्वाक्षरी घेवून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्याकडील ई-मेल आयडी dsojalgaoncovid19@gmail.com या ई-मेल आयडीवर अथवा Whatsapp क्रमांक 9637616730 वर पाठवावयाचा आहे. विहीत घोषणापत्राचा नमुना संबंधित नोंदणीकृत रुग्णालयाकडून भरून स्वाक्षरीनिशी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास ईमेल द्वारे सादर करावयाचा आहे.

त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने सादर केलेली रुग्णाची माहिती तपासुन सदर रुग्णासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला (उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अथवा तहसीलदार, पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्यापैकी एका अधिका-याच्या स्वाक्षरीने) जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात येईल. हा दाखला रुग्णालय प्रशासनाच्या ई-मेल आयडीवरच पाठविण्यात येईल.

रुग्णालय प्रशासनाने संबंधीत रुग्णास तातडीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार करावयाचे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 रुग्ण जर कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड सादर करु न शकल्यास सदर रुग्ण योजनेच्या लाभापासून वैद्यकीय उपचारापासून वंचित रहाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी नोंदणीकृत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनाही सूचना दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर डीन डॉ. खैरे यांच्यासह दोन जणांचे निलंबनाचे आदेश प्राप्त

Next Post

गुढे वि.का.स. सोसायटीच्या चेअरमन व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – डॉ. उत्तमराव धनाजी महाजन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
गुढे वि.का.स. सोसायटीच्या चेअरमन व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – डॉ. उत्तमराव धनाजी महाजन

गुढे वि.का.स. सोसायटीच्या चेअरमन व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - डॉ. उत्तमराव धनाजी महाजन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us