Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बूथरचना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा – आ. एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
January 19, 2024
in जळगाव
0
बूथरचना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा – आ. एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :  शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, पक्ष बांधणी मजबूत करायची असेल तर कार्यकर्ता निष्ठावान आणि प्रामाणिक असला पाहिजे, पक्षाची ध्येय धोरणे त्याला माहिती असली पाहिजेत, त्याने ग्राउंड लेव्हलला काम केले पाहिजे, गावा गावातील परिवाराशी त्याचे सौहार्दाचे नाते असले पाहिजे, सुखदुःखाच्या वेळी तो मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला पाहिजे. कार्यकर्ता घडण्यासाठी असे अभ्यास वर्ग अतिशय महत्त्वाचे असतात, यातून कार्यकर्ता घडतो, शिबिरात मिळालेली ही शिदोरी गावातील बुथरचना मजबूत करण्यासाठी वापरा,” वन बूथ थर्टी युथ ” याप्रमाणे बुथ रचना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे  केले.

येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवशीय निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नंदुरबारचे माजी आमदार श्री पाडवी साहेब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई,माजी आमदार अरुण दादा पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष  ॲड.  रोहिणी ताई खडसे, शिबिर प्रमुख यू.डी पाटील सर, प्रा. सुरेश पांडे सर, दीपक पाटील, आबा पाटील, किशोर पाटील, विलास धायडे, निवृत्ती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्ता घडण्यासाठी शिबिर  अर्थात अभ्यास वर्ग कसा महत्त्वाचा असतो हे स्पष्ट करून सांगितले. शिबिरात सहभागी सर्व शिबिरार्थींचे भाऊंनी अभिनंदन केले. याआधी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई यांनी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी  कार्यकर्त्यांनी पेटून उठणे गरजेचे असल्याचे सांगितले. महागाई बेरोजगारी हे प्रश्न प्रामुख्याने जनतेसमोर मांडण्याची त्यांनी आव्हान केले. यावेळी माजी आ. श्री पाडवी यांनी शिबिरामध्ये राबवलेल्या विविध उपक्रमाविषयी आयोजकांच्या अभिनंदन केले.

समारोपीय भाषणामध्ये ह्या ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पक्षाचे ध्येय धोरणांसह देशातील ज्वलंत प्रश्न जसे बेरोजगारी, महागाई जनतेसमोर पोहोचवा. देशात सुरू असलेली लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी पुढे या. सध्याचे सरकार हे मूठभर लोकांसाठी काम करीत असल्याची संत त्यांनी व्यक्त केली. शेतीमालाला भाव नाही, कापूस सोयाबीन, शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत, सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही… अशा या दळभद्री सरकारला   धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असल्याचे  भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले.

याआधी ॲड. रोहिणी ताई खडसे यांनी दोन दिवसीय शिबिरासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून बूथ प्रमुखांनी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून आतापासूनच कामाला लागा, पक्ष संघटन मजबूत करा येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय राष्ट्रवादीचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच  शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. सुनील नेवे सर यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. शिबिरात प्रा. सुरेश पांडे, प्रा. जतीन मेढे यांची प्रभावी व्याख्याने कार्यकर्त्यांना भुरळ पाडून गेली. तसेच आज निमखेड येथील युवराज सुभाष पाटील यांच्या मनोगताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.  रात्री टिकटिक वन मिनिट, मामाचं पत्र हरवलं, शेलापागोटे  या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांनी मनमुराद आनंद लुटला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोंदणीकृत, अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा – नंदकुमार काटकर

Next Post

वंचित बहुजन आघाडीची वाघारी येथे शाखेची स्थापना ; मोठ्या थाटात फलकाचे अनावरण

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
वंचित बहुजन आघाडीची वाघारी येथे शाखेची स्थापना ; मोठ्या थाटात फलकाचे अनावरण

वंचित बहुजन आघाडीची वाघारी येथे शाखेची स्थापना ; मोठ्या थाटात फलकाचे अनावरण

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us