Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बजेट-२०२०’; उद्या पहिला पेपर, आर्थिक पाहणी अहवाल

najarkaid by najarkaid
January 30, 2020
in राष्ट्रीय
0
बजेट-२०२०’; उद्या पहिला पेपर, आर्थिक पाहणी अहवाल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – विकासदराचा नीचांक, कर संकलनात घट, देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आलेली सुस्ती आणि जागतिक घडामोडी यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची वार्षिक परीक्षा उद्यापासून संसदेत सुरु होणार आहे. पहिल्या पेपरच्या रुपात शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन  संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. या आर्थिक पाहणी अहवालातून अर्थसंकल्पाची झलक दिसणार आहे. 

गेले वर्षभर आर्थिक आघाड्यांवर सरकारची कामगिरी कशी होती त्याचा लेखाजोखा आर्थिक पाहणी अहवालातून मांडण्यात येतो. त्याचबरोबर आगामी वर्षभरात अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी राहील, याचाही अंदाज व्यक्त करण्यात येतो. अर्थमंत्रालयाकडून आर्थिक पाहणी अहवाल तयार केला जातो. यात अर्थव्यवस्थेसाठी काही महत्वाच्या शिफारशी ‘आर्थिक पाहणी’त करण्यात येतात. मात्र त्यांची अंमलबजावणी करायची कि नाही ते सरकार ठरवत असते.

यंदा पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करणार आहेत. गेल्या वर्षी सीतारामन यांनी ४ जुलै रोजी आर्थिक पाहणी सादर केला होता. त्यानंतर ५ जुलै रोजी संसदेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. आर्थिक पाहणी अहवाल केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नेतृत्वात तयार करण्यात येतो. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राच्या वृद्धीचा आणि त्यातील अडथळ्यांचा आढावा घेऊन हा अहवाल तयार केला जातो. यात आगामी वर्षभरात कोणकोणत्या सुधारणा कराव्यात याबाबत शिफारशी करण्यात येतात. यंदा कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्यात आला आहे. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत.

चालू वर्षात अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार राहिली आहे. विकासदर (जीडीपी) सहा वर्षांचा नीचांकी स्तरावर आला आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचा विकासदर ४.८ टक्के राहील, असे भाकीत केले आहे. मंदीत रुतणाऱ्या अर्थचक्राला गती देण्याबरोबरच रोजगार निर्मिती आणि पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी भक्कम गुंतवणूक आणण्याचे आव्हान सीतारामन यांच्यापुढे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला ५ लाख कोटी अमेरिकी डाॅलरपर्यंत वाढवण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. मात्र जोपर्यंत वस्तूंची मागणी वाढत नाही आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जात नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारणार नाही. अर्थव्यवस्थेतील मूलभूत समस्यांवर तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे, जसे की रोकड टंचाई, पायाभूत प्रकल्पांमधील अडथळे, बँकांमधील समस्यांचे सरकारला तातडीने निराकारण करावे लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप-मनसे जवळीक वाढतेय; राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं

Next Post

दोन टन फुलांची आरास; विठ्ठल-रखुमाईचा शाही विवाह

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
दोन टन फुलांची आरास; विठ्ठल-रखुमाईचा शाही विवाह

दोन टन फुलांची आरास; विठ्ठल-रखुमाईचा शाही विवाह

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us