Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन

फाली संमेलनाच्या दुसऱ्या सत्राचा समारोप नावीण्यपूर्ण शेती उपकरणे व बिझनेस मॉडेल सादरीकरणात अव्वल ठरलेल्यांचा सन्मान

najarkaid by najarkaid
June 6, 2022
in जळगाव
0
फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. ५ (प्रतिनिधी) – ‘शेतीकडे नवीन पिढी वळत नाहीय त्यामुळे गावाकडून शहराकडे स्थलांतर वाढत आहे. देशाचे भविष्य असलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांमध्ये मॉडर्न एग्रीकल्चर संस्कृती रूजावी, जेणे करून शेतीत अत्याधुनिक साधनांचा वापर करून आर्थिक सुबत्ता येईल. यासाठी फालीमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, इंटरशिप आणि व्यवसायासाठी आवश्यक ते प्रोत्साहन दिले जाईल असे सांगत भविष्यात फालीमधील विद्यार्थी एग्रीकल्चरचे नवे मॉडेल उभे करित असा विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.

फाली संम्मेलनाच्या समारोपाप्रसंगी अनिल जैन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोदरेज अॅग्रोव्हेटचे संचालक बुर्जीस गोदरेज, स्टार एग्रीचे संचालक अमित अग्रवाल, फालीच्या संचालिका नॅन्सी बेरी, जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन व परिक्षक मान्यवर उपस्थित होते.

अनिल जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, चांगल्या काळात आणि आव्हानांच्या काळात सगळयात महत्वाची गोष्ट अशी तुमचे लक्ष तुमच्या उद्दिष्टावर असायला हवे. फाली आणि कृषी व्यवसाय यातील नेते म्हणून भावी जीवनात आणि भविष्यात याचा उपयोग होईल. तुम्ही आव्हानांच्या काळात असतांना तुम्ही जे काम कराल त्यात खूप सुधारणा करा. ‘कृषी तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय यात लोकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. जैनचे सहकारी एकत्र काम करण्यावर विश्वास ठेवतात आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा वापर करतात. जैन सहकाऱ्यांच्या सतत प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल होतो.’ भविष्यातील फाली नायक उपक्रमात आधुनिक कृषी क्षेत्रीतील तंत्र, तुमच्या गावासाठी नेतृत्व करण्याच्या व सकारात्मक बदल घडवण्याच्या क्षमतेवर खूप विश्वास आहे.

फालीचे विद्यार्थ्यांचे सादरकीरण प्रभावशाली – बुर्जीस गोदरेज
आधुनिक शेती शाश्वत बनवण्यासाठी तुम्ही फालीचे विद्यार्थी उत्साही आणि जिद्दी आहेत. जगातील सर्व लोकांसाठी अन्नधान्य पिकवणे हे आवश्यक आहे. भारतीय कृषीक्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे असे फालीच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहिल्यानंतर वाटते यातुन उद्योजकाची वाट धरली जाते. आधुनिक शेती करण्यासाठी प्रेरणा मिळते. नवीन व्यवसाय करा किंवा जे काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या. माझा तुम्हाला हा सगळयात महत्त्वाचा सल्ला आहे. जे लोक तुमचा दृष्टीकोन समजतील आणि अतिशय वचनबद्ध, गुणवंत असतील अशा लोकांना तुम्ही तुमच्या अवतीभवती कायम स्थान द्यावे.

समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी फालीच्या कॅप्स उडवून सहभागाचा आनंद व्यक्त केला. नावीन्यपूर्ण शेती उपकरण व व्यवसाय योजनामधील सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पदक देऊन गौरविण्यात आले. यासह प्रायोजक कंपन्यांच्या प्रतिनिधीचा फालीच्या संचालिका नॅन्सी बेरी यांच्याहस्ते सूतीहार देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी संवाद साधला. सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाडगे यांनी केले.

नावीन्यपूर्ण (इन्होवेशन) शेती उपकरणांमधील विजेते
एम.जी. शहा विद्यामंदीर ज्यूनिअर कॉलेज, कोल्हापूर (प्रथम), खान्देश गांधी बाबूभाई मेहता विद्यालय कासरे धुळे (द्वितीय), महात्मा गांधी विद्यालय सातारा (तृतिय), कन्या विद्यालय सामोळे धुळे (चतुर्थ), दानोळी हायस्कूल, कोल्हापूर (पाचवा) हे विजेते ठरले.
व्यवसाय (बिझनेस) योजनामधील विजेते
नव महाराष्ट्र विद्यालय पांढरे पुणे (प्रथम), सोमेश्वर विद्यालय अंजनगाव पुणे (द्वितीय), खान्देश गांधी बाबुभाई महेता विद्यालय कासरे धुळे (तृतीय), दानोळी हायस्कूल, कोल्हापूर (चतुर्थ), शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर पुणे (पाचवा) हे विजेते ठरले.
■■

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

EMI पुन्हा महागणार? RBI कडून रेपो दर वाढण्याची शक्यता

Next Post

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विनापरिक्षा थेट नोकरीची संधी.. एक लाखाहून अधिक पगार मिळेल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ईएसआयसीमध्ये 3600 पदांची मेगा भरती, असा करा अर्ज

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विनापरिक्षा थेट नोकरीची संधी.. एक लाखाहून अधिक पगार मिळेल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us