Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून वाद; ठाले-पाटलांना धमक्या

najarkaid by najarkaid
September 25, 2019
in राज्य
0
फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून वाद; ठाले-पाटलांना धमक्या
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद- ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या ‘धर्मगुरु’ असण्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी टीका सुरू केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना अध्यक्षाची निवड मागे घेण्यासाठी धमकीवजा फोन येत आहेत. ख्रिश्चन व्यक्तीला मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करू नका अशी दटावणी करण्यात आली आहे. या चिघळलेल्या वातावरणात साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांनी महामंडळाला पाठिंबा दिला आहे.
९३ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उस्मानाबाद शहरात जानेवारी महिन्यात संमेलन होणार आहे. दिब्रिटो यांच्या नावाची शिफारस पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली होती. या प्रस्तावाला साहित्य महामंडळाच्या इतर घटक संस्थांनी पाठिंबा दिला होता. साहित्यिक दिब्रिटो ‘धर्मगुरू’ असल्याचा ठपका ठेवत काही हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींनी सोशल मीडियावर पहिल्याच दिवशी टीकेची झोड उठवली होती. दिब्रिटो यांच्या ललित व वैचारिक लेखनाकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या धार्मिक पुस्तकांचा उल्लेख सोशल मीडियावर ठळकपणे करण्यात आला होता. दोन दिवस सोशल मीडियावर सुरू असलेली टीका आता साहित्य महामंडळाच्या अध्यक्षाला धमकीचे फोन करण्यापर्यंत पोहचली आहे.

‘दिब्रिटोंना विरोध मराठी भाषेला भूषणावह नाही’

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना मंगळवारी (२४ सप्टेंबर) दिवसभरात शंभरपेक्षा जास्त फोन आले. काही व्यक्तींनी फोन करुन फादर दिब्रिटो यांच्या निवडीचा निषेध नोंदवला. तर काहींनी धमकी देत निवड रद्द करण्याची मागणी केली. या प्रकारामुळे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी धास्तावले आहेत. दिब्रिटो यांच्या कोणत्या पुस्तकावर तुमचा आक्षेप आहे असे ठाले यांनी विचारले. मात्र, दिब्रिटो यांचे पुस्तक वाचले नाही. ख्रिश्चन व्यक्तीला संमेलनाध्यक्ष करण्याची तुमची हिंमत कशी होते असा प्रतिसवाल धमकी करणाऱ्या व्यक्तींनी केला, असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

करुणा आणि ऋजुतेचा गौरव

दरम्यान, चिघळलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. ‘फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड लोकशाही प्रक्रियेने झाली आहे. लोकशाही पध्दतीने विरोध करण्याचाही अधिकार इतरांना आहे. दिब्रिटो यांची निवड हीच साहित्य महामंडळाची भूमिका आहे. त्यामुळे वेगळी भूमिका मांडण्याची आवश्यकता नाही’,असे महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी सांगितले.

साहित्यविषयक प्रयोगांचा पुरस्कार करणार

मुंबईतून सर्वाधिक फोन

फादर दिब्रिटो यांच्या निवडीला पुण्यात ब्राह्मण महासंघ आणि विश्व हिंदू परिषदे विरोध केला आहे. महामंडळाला सर्वाधिक निषेधाचे फोन कल्याण, ठाणे, मुंबई या भागातून आले. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिब्रिटो यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. तर हिंदुत्ववादी संघटना विरोध करीत असताना अद्याप सरकारने दखल घेतलेली नाही. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा बहुमान प्रथमच ख्रिश्चन साहित्यिकाला मिळाला आहे. हा सामाजिक समतेचा योग्य संदेश असल्याचे सांगत साहित्यिक आणि पुरोगामी संघटनांनी महामंडळाला पाठिंबा दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान मोदी, डोवल ’जैश’च्या निशाण्यावर

Next Post

घोटाळा झालाय तर बँकेचा नफा 300 कोटींपर्यंत कसा?: अजित पवार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
घोटाळा झालाय तर बँकेचा नफा 300 कोटींपर्यंत कसा?: अजित पवार

घोटाळा झालाय तर बँकेचा नफा 300 कोटींपर्यंत कसा?: अजित पवार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us