Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने रक्तदानाचा विक्रम

najarkaid by najarkaid
January 11, 2021
in राज्य
0
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आठशे पिशव्या रक्त संकलन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी पत्रकारांनी रक्तदान शिबीरांचे आयोजन करत तब्बल 823 पिशव्यांचे संकलन करुन विक्रम नोंदवला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या रक्तदानाच्या आवाहनाला राज्य पत्रकार संघाने प्रतिसाद देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महारक्तदान करत कोरोना काळात सामाजिक दायीत्वच निभावले. पहिल्यांदाच राज्यभर पत्रकारांनी एकाच दिवशी रक्तदान करण्याचा संकल्प यशस्वी केला. याबद्दल पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने संघटना, नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारी 2021 रोजी संघाच्या पदाधिकार्‍यांनी राज्यभर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करुन स्वतःही रक्तदान करावे असे आवाहन केेले होते.

नवीन वर्षाची सुरुवात पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक संस्था, आरोग्य प्रशासन यांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर आयोजित करुन आठशे पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा विक्रम केला. राज्य संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी सांगली येथे अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेतील वृत्तपत्र महाविद्यालयात रक्तदान शिबीरात 42 पिशव्या रक्त संकलन केले. तर नाशिक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डोळस आणि शहराध्यक्ष दिलीप कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली 114 पिशव्या रक्त. तर गोवा राज्याचे संपर्क प्रमुख शिवाजी नेहे यांनी श्री स्वामी समर्थ मठ शिवोली यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वाधिक 125 पिशव्या रक्त संकलन केले. सोलापूरमध्ये जिल्हाध्यक्ष मनिष केत यांनी 51 तर सतिश सावंत यांंच्या नेतृत्वाखाली 60 अशा 111 पिशव्या रक्त संकलन झाले. अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते व अनिल रहाणे, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी तीन ठिकाणी रक्तदान शिबीरातून 94 रक्त पिशव्यांचे संकलन केले. उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रविण सपकाळे आणि खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात 51 पिशव्यांचे रक्त संकलन झाले. विदर्भात विभागीय अध्यक्ष महेश पानसे यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया मध्ये जिल्हाध्यक्ष राधेशाम भेंडारकर यांच्या पुढाकारातून 54 पिशव्या रक्त. तर बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष लहाने व शहराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी 11 पिशव्या रक्त संकलन केले. मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण यांनी रक्तदान शिबीरातून 50 पिशव्या रक्त तर औरंगाबाद विभागीय कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रभू गोरे आणि शहराध्यक्ष अनिल सावंत यांनी शिबीरातून 43 पिशव्या रक्त संकलन केले. बीड येथे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी रक्तदान शिबीरात 23 पिशव्या. तर लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी 25 पिशव्या आणि जालना जिल्हाध्यक्ष दिगांबर गुजर यांनी 80 पिशव्या रक्त संकलन केले. राज्यात पहिल्यांदाच पत्रकारांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन एकाच दिवशी आठशे पेक्षा जास्त पिशव्या रक्त संकलन करण्याचा विक्रम नोंदवला. राज्य पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पदाधिकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन सामाजिक जाणीव ठेवल्याबद्दल संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य संघटक संजय भोकरे यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्राध्यापक वर्गाच्या ‘CAS Scheme’ च्या बेकायदेशीर मुलाखती थांबवा

Next Post

जळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होवू नये याकरीता यंत्रणानी दक्ष रहावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

Related Posts

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होवू नये याकरीता यंत्रणानी दक्ष रहावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

जळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होवू नये याकरीता यंत्रणानी दक्ष रहावे - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us